

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'चल भावा सिटीत' या शोच्या एका प्रोमोमध्ये एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते, ज्यावर कॅप्शन असं होते कि - 'तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कंमेंट्समध्ये सांगा!' यावर अनेक युजर्सनी 'श्रेयस तळपदे' अशी कमेंट केली.
‘श्रेयस तळपदे’ पुन्हा एकदा झी मराठीवर आणि छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यांच्या फॅन्ससाठी ही एक आनंदाची बातमी आहे, कारण झी मराठीच्याच 'माझी तुझी रेशीमगाठ' या सुपरहिट मालिकेतील यश-नेहा जोडी खूप गाजली होती. पण यावेळी श्रेयस 'चल भावा सिटीत' या नवा रिॲलिटी शोचा होस्ट म्हणून दिसणार आहे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाने शो मध्ये रंग भरताना दिसणार आहे. या कार्यक्रमाचं भन्नाट शीर्षकगीत नुकतंच झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर रिलीज करण्यात आलं. याचं शीर्षकगीतातील श्रेयसची हुक स्टेप आणि श्रेयसचा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील स्पर्धक एकत्र येणार आहे.
चल भावा सिटीत हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळूहळू उलगडत जाईल. नवा कार्यक्रम 'चल भाव सिटीत' १५ मार्चपासून रोज रात्री ९.३० वा. झी मराठीवर पाहता येईल.