

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांना अनेकदा स्पॉट करण्यात आलं होतं. पण, दोघांकडून त्यांच्या रिलेशनशीप विषयी कोणतीच माहिती समोर आली नव्हती. दरम्यान, Shraddha Kapoor या नावाने असलेल्या एक्स अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये एक कपल उभे असलेले दिसते. त्यावर रेड हार्ट इमोजी शेअर करत राहुल मोदीचे नाव लिहिलेले दिसते. यावरून तिने आपले नाते कन्फर्म केल्याचे म्हटले जात आहे. पण श्रद्धाचे हे अधिकृत एक्स अकाऊंट अधिकृत दिसत नाही. पण, तिच्या इन्स्टा स्टोरीला हाच फोटो दिसतो आहे. हे इन्स्टाग्राम अकाऊंट श्रद्धा कपूरचे अधिकृत हँडल आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर लेखक राहुल मोदीला डेट करत असल्याचे वृत्त समोर आले होते. श्रद्धाच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर राहुल मोदीचा फोटो व्हायरल झाला होता.
'तू झूठी मैं मक्कार'च्या सेटवर राहुल आणि श्रद्धा यांची भेट झाल्याचे म्हटले जाते. काम करताना दोघांची मैत्री झाली होती. आता तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती राहुल सोबत दिसत आहे. फोटोमध्ये केवळ दोघांचे पाय दिसत आहेत. श्रद्धा आणि राहुलने एकसारखे कपडे घातलेले दिसत आहेत. फोटो शेअर करत श्रद्धाने राहुलला टॅग केलं आहे.