ॲडव्हान्स बुकिंगमध्येच 'Stree 2' चा धमाका; 'खेल खेल में', वेदाला टाकलं मागे

ॲडव्हान्स बुकिंगमध्येच 'स्त्री २' चा धमाका; 'खेल खेल में', 'वेदा'ला टाकलं मागे
Stree 2
ॲडव्हान्स बुकिंगमध्येच 'Stree 2' चा धमाका; खेल खेल में, वेदाला टाकलं मागे Stree 2
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा हॉरर-कॉमेडी 'स्त्री २' हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे, १५ ऑगस्टला चित्रपट गृहात रिलीज होणार आहे. 'स्त्री २' ला टक्कर देण्यास आणखीण दोन चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत. बॉलिवूडची खिलाडी अक्षय कुमार, वाणी कपूर, फरदीन खान, तापसी पन्‍नू, एमी विर्क यांचा 'खेल खेल में' आणि बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम, शरवरी वाघ यांचा 'वेदा' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. आज सकाळपासून तिन्ही चित्रपटाचे जोरदार ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. दरम्यान ॲडव्हान्स बुकिंगमध्येच 'स्त्री २' चित्रपटाने भरघोष अशी कमाई करत 'खेल खेल में', 'वेदा' चित्रपटाला मागे टाकले आहे.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, आज दि. १३ ऑगस्टच्या सकाळपासून राजकुमार रावचा 'स्त्री २', अक्षय कुमारचा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमच्या 'वेदा' चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंग सुरूवात झाली. बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यापूर्वीच पहिल्याच दिवशी 'स्त्री २' चित्रपटाने २ लाख २१ हजार ५०८ तिकिटांची विक्री केली आहे. यातून चित्रपटाने रिलीजपूर्वी ६.८७ कोटींची भरघोष अशी कमाई केली आहे. अजून हा चित्रपट रिलीज होण्यास दोन दिवस शिल्लक आहेत. यामुळे अजून कमाईचे आकडे वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय या चित्रपटाला १५ ऑगस्टच्या सुट्टीचाही फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेद' या चित्रपटांच्या कमाईचे आकडे हळू-हळू वाढताना दिसत आहेत. या दोन्ही चित्रपटांनी ॲडव्हान्स बुकिंगमधून आज जवळपास ३०-३० लाख रुपयांची कमाईपर्यत पोहोचले आहेत. 'खेल खेल में' ची केवळ ५५४७ तिकिटे विकली गेली असून त्यातून २२.६१ लाख रुपयांची कमाई झाली आहे.

तर 'वेदा'ची १० हजार ५०६ तिकिटे विकली गेली असून यातून एकूण २९.९७ लाख रुपयांची कमाई झाली आहे. अजून हा चित्रपटाला रिलीज होण्यास दोन दिवस शिल्लक असल्याने यांचीही कमाईचे आकडे वाढण्याची शक्यता आहे. मात्र, आता पहिल्या दिवशी राजकुमार रावचा 'स्त्री २' ॲडव्हान्स बुकिंगमधून भरघोष करत आहे. यामुळे 'खेल खेल में', 'वेदा' मागे पडत चालले आहेत. अद्याप तिन्ही चित्रपटाच्या अधिकृत्त कमाईचे आकडे समोर येणे बाकी आहे.

Stree 2
Stree 2 Trailer Launch : 'सरकटे'च्या दहशतीपासून कसे वाचणार 'विक्की भैया'; बहुप्रतिक्षित 'स्त्री 2'चा ट्रेलर रिलीज

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news