Shiva Serial | सीताई दिसणार शिवाच्या लूकमध्ये, वाजवणार शिट्टी आणि चालवणार बाईक

"जेव्हा मी या लूकमध्ये बाहेर पडले तेव्हा येता जाता सेटवरचे लोक..." - मीरा वेलणकर
Shiva Serial
शिवाच्या लूकमध्ये सीताईInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - "शिवा" मालिकेत अशा काही घडामोडी घडणार आहेत, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. सीताई ठरवते की ती शिवाच्या वेगळेपणाला लाज न बाळगता समाजासमोर सन्मानाने ठेवेल. या निमित्ताने शिवा-सीताईच्या नात्याचा नवीन अध्याय सुरू होत आहे. शिवा सीताईला स्वतः करत असलेल्या सगळ्या गोष्टी शिकवायला लागते. शिट्टी कशी वाजवायची, बाईक कशी चालवायची, तिखट जेवण कसं खायचं, आणखी भरपूर काही... सीताई या नव्या अनुभवांचा आनंद घेत आहे. पण हे सगळं पाहून कीर्ती अस्वस्थ होते आणि शिवा-सीताईमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मात्र, सीताई तिला जोरात चापट मारते.आशु आणि शिवाच्या भांडणामागे दिव्याचा हात असल्याचं समोर येत. हे सत्य समोर येताच बाई आजी आणि वंदना संतापतात. बाई आजी दिव्याला घराबाहेर काढते.

हे सर्व सुरु असताना प्रेक्षकांना मात्र सीताई आणि शिवाच नातं पाहताना खूप मज्जा येणार आहे. सीताईची भूमिका साकारत असेलेली अभिनेत्री म्हणजेच 'मीरा वेलणकर' ह्यांनी आपल्या नवीन लुक बद्दल बोलताना आपला अनुभव व्यक्त केला.

"गेले वर्षभर मी सीताईची भूमिका साकारत आहे, शिवाच्या विरोधात उभी राहणारी, तिचा स्वीकार न करणारी, तिच्या पेहरावावर टीका करणारी, पण आता मालिकेत अचानक एक ट्विस्ट येणार आहे, सीताई, शिवाचा स्वीकार करणार आहे. तीच खरं रूप समजून घेऊन सीताई एक प्रेमळ व्यक्ती, आई आणि सासू म्हणून शिवाच्या वेगळेपणाला आपलंस करणार आहे, आणि ह्याचवेळी आम्ही दोघी मिळून धमाल करणार आहोत. तुम्ही पाहिलच असेल की, पारंपरिक पद्धतीनी वावरणारी सीताई, शिवा सारखी पँट आणि शर्ट मध्ये दिसणार आहे. मला एक गोष्ट आणखीन सांगायला आवडेल की, मी शिट्टी वाजवायला शिकणार आहे. जेव्हा मी या लूकमध्ये तयार होऊन बाहेर पडले तेव्हा येता जाता सेटवरच्या लोक थांबून मला बघत होते. प्रेक्षकांना हा एक छान सुखद धक्का भेट मिळणार आहे. मी आणि शिवाने सेम शर्ट घातले आहे. नेहमी जेव्हा सीन्स होतात तेव्हा सर्व आपल्या कामात व्यस्त असतात पण जेव्हा तो एन्ट्री सीन शूट होत होता तेव्हा पूर्ण युनिट मॉनिटर स्क्रीनवर त्या सीनचा आनंद घेत होते. एक आर्टिस्ट म्हणून मला खूप आनंद झाला करणं असे सीन्स सारखे लिहिले जात नाहीत आणि मला ते शिवा मालिकेत साकारायला मिळाले माझं भाग्य समजते. सीताईच्या हातातल्या हिरव्या बांगड्याचा जागी शिवासारखं कड आणि लेदर बेल्ट घालून भाईसाब असं म्हणावसं वाटलं. पण मला आठवलं की, जरी मी कपडे शिवा सारखे घातले आहेत पण आतून मी सीताईच आहे. तर मस्ती करायची पण सीताईच्या पद्धतींनी. अशी संधी आर्टिस्टला करायला मिळणे ही मोठी गोष्ट आहे आणि ही संधी मला मिळाली". "शिवा" दररोज रात्री ९ वा. झी मराठीवर पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news