Shilpa Shinde | 'हा' अभिनेता तिसऱ्यांदा करणार लग्न, शिल्पा शिंदेशी जवळीकची चर्चा
पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘भाभीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे हिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सध्या शिल्पा शिंदे ‘खतरों के खिलाडी १४’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक आहे. या शोमध्ये करणवीर मेहरादेखील स्पर्धक आहे. स्टंट करताना दोघांचे संवादही ऐकायला मिळताहेत. आता शिल्पा शिंदेच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. याचे कारण म्हमजे शोमध्ये करण आणि शिल्पा यांच्यातील एक संवाद होय. (Shilpa Shinde)
शिल्पा शिंदे हिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय ती ‘बिग बॉस ११’ ची विजेती आहे. सध्या ती ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये दिसत आहे. वेगवेगळे स्टंट करताना करणवीर मेहरा तिच्यासोबत दिसतोय. यावेळी स्टंट करताना त्यांच्यातील संवाद समोर आले आहे. शिल्पा-करणवीर मेहरा लग्न करणार का, याकडे त्यांच्या फॅन्सचे लक्ष आहे.
करणवीर मेहरा-शिल्पा शिंदे यांच्यात काय संवाद झाला?
करणवीर ‘खतरों के खिलाडी १४’ मध्ये शिल्पासह तो दिसत आहे. एका स्टंट दरम्यान करणवीर शिल्पाला म्हणाला की, ''जर आपण हा स्टंट जिंकलो तर लग्न करू.'' यावर शिल्पाने उत्तर दिलं की, नाही, गडबड होईल. को-ऑर्डिनेशन नीट होणार नाही.'' यावर करण म्हणाला, ''काही अडचण येणार नाही, आपण करू.''
कोण आहे करणवीर मेहरा?
करण वीर मेहरा एक टीव्ही अभिनेता आहे. वेब सीरीज कपल ऑफ मिस्टेक्समध्ये तो बरखा बिष्टसोबत दिसला. सोनी सब टीव्ही मालिका बीवी और मैं मध्ये तो मुख्य भूमिकेत होता. रागिनी एमएमएस २ , मेरे डॅड की मारुती, ब्लड मनी , बदमाशिया, आमीन यासारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे.
तिसरी पत्नी होणार शिल्पा शिंदे?
अभिनेता करणवीर मेहराची याआधी दोन लग्ने झाली आहेत. आता स्टंट करताना जे संवाद ऐकू आले ते पाहून करणवीर आणि शिल्पा लग्न करतील, असा अंदाज लावला जात आहे.

.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)