

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या घरी पाळणा हलणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिबानी प्रेग्नेंट आहे. आज फरहान अख्तरचा ५१ वा वाढदिवस आहे. फरहान अख्तरचे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओजदेखील समोर आले आहेत. त्यामध्ये तो आपल्या काही खास मित्र आणि फॅमिलीसोबत वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिनी फरहान अख्तरच्या घरातून एक गूड न्यूज मिळालीय. रिपोर्टनुसार, फरहान अख्तर बाबा होणार आहे. पण, फरहान वा त्याच्या घरच्यांकडून ही गोष्ट कन्फर्म झालेली नाही.
फरहान अख्तर-शिबानी दांडेकरने २०२२ मध्ये लग्न केले होते. फरहानचे हेदुसरे लग्न होते. आधी फरहानने २००० मध्ये अधुना भबानी सोबत लग्न केले होते. २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. फरहान आणि अधुना भबानीच्या दोन मुली आहेत.