

बॉलीवूडमधून अनेक चांगल्या वाईट गोष्टी समोर येत असतात. काही अभिनेत्रींना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री शेफाली जरिवाला हिच्या वैवाहिक आयुष्यातही नेक चढ-उतार आले. शेफालीला 'कांटा लगा' गाण्यातून खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने हरमीत सिंगसोबत लग्न केले. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांत अनेक वाद निर्माण झाल्यामुळे शेफाली २००९ मध्ये हरमीत सिंग याच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर २०१४ मध्ये शेफालीने टीव्ही अभिनेता पराग त्यागीसोबत लग्न केले. पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर शेफाली आता परागसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो देखील तुफान व्हायरल होत असतात. पहिल्या लग्नाबद्दल शेफाली म्हणाली, तुमचे कौतुक केले जात आहे की नाही, हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. कोणतीही हिंसा केवळ शारीरिकच असू शकत नाही.. मानसिक हिंसाही होते आणि ज्यामुळे खूप त्रास होतो. ज्यामुळे आपण कायम दुःखी राहतो.