सिनेमे आणि वाद हे समीकरण नवीन नाही. एखाद्या सिनेमाबाबत वाद कधी कलाकारांसंदर्भात असतो, कधी सिनेमाच्या कथेसंदर्भात असतो तर कधी सिनेमातील एखाद्या सीनबाबतचा असतो. असाच एका सिनेमाबाबतचा वाद उफाळून आला आहे. (Latest Entertainment News)
शेन निगमचा आगामी रोमॅंटिक ड्रामा 'हाल' सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. सेन्सॉरने या सिनेमात 15 दृश्यांना कात्री लावली आहे. या दृश्यात संबंधित कलाकार बीफ बिर्याणी खाताना दाखवले आहेत. सेन्सॉरच्या या आक्षेपामुळे 'हाल'चा रिलीज अडचणीत आला आहे.
सिनेमाच्या पीआरओनुसार बोर्डाने निर्मात्यांना 15 सीन हटवण्यास सांगितले आहेत. ज्यामध्ये 'ध्वजा प्रणाम', 'संघम कवल उंड', आणि बीफ बिर्याणी खातानाच्या दृश्यांचा समावेश आहे.
या प्रकारावर निर्मात्यांचे म्हणणे काय आहे?
बोर्डाच्या निर्णयावर निर्मात्यानी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय सिनेमामध्ये असे कोणतेही दृश्य असल्याचा इन्कार केला आहे. असा कोणता सीन असल्याचा निर्मात्यांचा समज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जर सेन्सॉरचे म्हणणे मान्य केले तर ?
सिनेमातील कट जर सेन्सॉरच्या म्हणण्यानुसार केले गेले तर सिनेमाला बोर्डाकडून A प्रमाणपत्र मिळू शकते. 10 सप्टेंबरला सेन्सॉर बोर्डासाठी सिनेमाचा शोही आयोजित केला होता.
कोण कोण आहेत या सिनेमाचा भाग?
हालचे दिग्दर्शन वीराने केला आहे. तर निषाद कोयाने या सिनेमाचे लेखन केले आहे. या सिनेमात शेन निगमसोबत साक्षी वैद्य आणि जॉनी एन्टनी मुख्य भूमिकेत आहे.
कधी रिलीज होणार सिनेमा?
यापूर्वी निर्मात्यांनी दुसरा सिनेमा बलतीसोबत टक्कर होऊ नये म्हणून हा सिनेमा पुढे ढकलला गेला होता.
निर्मात्यांचा निर्णय काय आहे?
हा सिनेमा रिलीज होण्यासाठी 15 कट करण्याचे निर्मात्यांची इच्छा दिसत नाही. उलट त्यांनी या सिनेमात असा काही सीन नसल्याचे सांगितले आहे. या निर्णयांविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील केली आहे.