“मुलगा रात्रभर घरी नाही आला अन्‌ मीरा वेलणकर रडली…”

शाल्व किंजवडेकर-मीरा वेलणकर
शाल्व किंजवडेकर-मीरा वेलणकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आईपण साजरा करायला एका मातृ दिवसाची गरज नाही. 'शिवा' मालिकेतल्या सीताई म्हणजेच मीरा वेलणकरने आपल्या आईपणाचे आणि सेटवर आशुच्या आईची भूमिका निभावताना असं काय झालं की तिला रडू आले. याचे किस्से त्यांनी सांगितले.

जोपर्यंत मी आई झाले नव्हते तोपर्यंत माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअरवर होतं. मी ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करत होते. म्हणतात ना आई झाल्यावर आयुष्य बदलून जातं तर त्या वाक्याचा अर्थ नाही कळायचा असा वाटायचं की, बाळ झाल्यावर काही महिन्यांसाठी वेळ आणि लक्ष बाळावर राहील आणि मग काही महिन्यानंतर सर्व पाहिल्यासारखं होईल. पण आई झाल्यावर लक्षात आलं की, माझ्यामध्ये आपणहून बदल होत आहेत, ते लहानबाळ तुमचं सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतं.

आईपण शिकावं नाही लागतं ते तुमच्यामध्ये आपसूक येतं. माझा मुलगा जन्माला आला तेव्हा सुरुवातीचे काही दिवस माझ्या डोक्यात हाच विचार चालू असायचा की त्यांनी खाल्लं का, त्याची अंघोळ झाली का, त्याला आता भूक लागली असेल का? या सर्वामध्ये मी हे विसरून जायचे की, माझी विश्रांती झाली आहे की नाही आणि हे सगळं फक्त आईपण अनुभवल्यावरच होऊ शकत. कुठली ही गोष्ट असो ती अभ्यासपूर्व करायची अशी माझी पद्धत आहे म्हणून मी गरोदर असताना प्रेग्नन्सी, पोस्ट-प्रेग्नन्सी, मुलाचं संगोपन, मुलाचा विकास या सगळ्याची खूप पुस्तक वाचली होती. खूप माहिती होती. पण जेव्हा मी खऱ्या अर्थानी आई झाले तेव्हा कळले की ती माहिती आहे, अनुभव नाही.

माझा मुलगा खूप लाजाळू आणि अंतर्मुख होता. त्याला शाळेत आणि लोकांशी रमायला वेळ लागायचा आणि यामुळे मी तिथे असणं अपरिहार्य असायचं, मी कधी-कधी थकून जायचे, त्यावेळी मला समजले की, संयम किती महत्वाचा आहे. फक्त संयमच नाही तर स्वीकृती असणे ही गरजेचं आहे. आई म्हणून माझ्या हे लक्षात आलं की, माझ्या मुलाचा स्वभाव वेगळा आहे आणि मी ते स्वीकारले तेव्हा त्याच्यातला ही बदल मला दिसू लागला आता त्याच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की तो अंतर्मुख होता इतका उस्फूर्त मुलगा आहे.

आम्ही तिघी बहिणी, माझी आई शिक्षिका होती आणि ती घर आणि काम दोन्ही सांभाळायची ती माझी हिरो आहे. मी तिला इतकचं बोलू शकते खूप खूप धन्यवाद. कारण ती जे करू शकली ती एक सुपरवुमनच करू शकते. 'शिवा' मालिकेत मी आशुची आई आहे आणि त्याच आणि माझं नातं खूप पेमळ आहे. माझा मुलगा फक्त १२ वर्षाचाच आहे. 'शिवा' मालिकेच्या निम्मिताने मला कळेल की, मला पुढे जाऊन कसं वागायला हवे आणि कसं नाही. एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतोय, "एकदा तुम्ही आई झालात की तुमच्यात एक प्रेमभावना असते, मग ते ऑनस्क्रीन मुलगा असो किंवा खरा मुलगा. त्यादिवशी आम्ही एक सीन करत होतो जिथे आशु रात्रभर घरी आलेला नसतो आणि आई म्हणून मी अत्यंत काळजीत असते मग अचानक तो घरी येतो मी त्याला पाहते आणि रडायलाच लागते तेव्हा माझ्या मनात हे चालू होतं की खऱ्या आयुष्यात जर माझा मुलगा घरी आला नाही तर मी काय करेन त्या विचाराने शॉट देता देता माझं डोळे पाणावले. तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाली."

आशु आणि सिताईच्या नात्यातले गोड क्षण शिवा मालिकेत पाहता रोज रात्री ९ वा. झी मराठीवर पाहा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news