पुढारी ऑनलाईन डेस्क - बाल कलाकार म्हणून शाका लाका बूम बूम मध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचा साखरपुडा झाला. किंशुक वैद्य असे त्याचे नाव असून त्याने गर्लफ्रेंड दीक्षा नागपालशी साखरपुडा केला आहे. शाका लाका बूम बूम मध्ये त्याने संजूची भूमिका साकारली होती. त्याने लॉन्गटाईम गर्लफ्रेंड आणि कोरिओग्राफर दीक्षा नागपालशा साखरपुडा केला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.
किंशुक वैद्य - दीक्षा नागपाल निळ्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. दोघे फोटोमध्ये एकमेकांचा हात धरलेला दिसत आहेत. त्यामध्ये त्यांची एंगेजमेंट रिंग दिसते.
दोघांचा हा सुंदर अंदाज फोटोंमध्ये दिसून असून कॅप्शनमध्ये वाईट नजरेने वाचण्यासाठीची एक इमोजी शेअर केली आहे. त्याचे चाहते भरभरून अभिनंदन आणि शुभेच्छा देत आहेत.