

शाहरुख खान 60 वा वाढदिवसानिमित किंगची पहिली झलक चाहत्यांसमोर आली. यानंतर शाहरुखने चाहत्यांशी संवाद साधत या सिनेमाविषयी आणखी माहिती शेयर केली आहे. या सिनेमात तो पुन्हा दीपिकासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. शाहरुखने स्वत: याचा खुलासा केला आहे. (Latest Entertainment News)
सिनेमाबाबत बोलताना शाहरुख म्हणतो, ‘मी आताच सिनेमाची गोष्ट शेयर करायची नाही. जसे जसे सिनेमाशी जोडलेल्या गोष्टी समोर येतील ते तुम्हाला समजून जाईल. सिनेमात अनेक पात्रे आहेत. सिनेमाचा उद्देश हा दाखवणे आहे की जेव्हा आपण गोष्टी फार वैयक्तिकरित्या घेतो, तेव्हा आपण मोठे निर्णय घेतो. अशा वेळी आपण विचार केला पाहिजे की आपण जे करत आहोत, ते बरोबर आहे की नाही
2007 मध्ये आलेल्या ओम शांती ओम या सिनेमात दीपिका आणि शाहरुख ही जोडी सुपरहिट होती. त्यानंतर चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इयर, पठाण, जवान या सिनेमात दिसली होती. आता ही जोडी किंगमध्ये कशी दिसेल याची उत्सुकता फॅन्सना लागून राहिली आहे.
दीपिका पादुकोण, अभय वर्मा, अरशद वारसी, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत आणि राघव जुयाल हे कलाकार तर आहेतच. याशिवाय राणी मुखर्जी, अनिल कपूर, जैकी श्रॉफ, सौरभ शुक्ला, अक्षय ओबेरॉय आणि करणवीर मल्होत्रा अशी भलीमोठी जंत्री या सिनेमात दिसणार आहे.