सत्य समजल्यावर सिद्धू-भावनाचं नातं बहरेल? श्रीनिवासचं सत्य लक्ष्मीसमोर आल्यावर काय होईल?

Laxmi Niwas | सिद्धूचं सत्य काय बदल घडवेल त्याच्या आणि पूर्वीच्या नात्यात? सत्य समजल्यावर सिद्धू आणि भावनाचं नातं बहरेल?
Laxmi Niwas serial
सिद्धू-भावनाचं नातं बहरणार? Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'लक्ष्मी निवास' मालिकेत सध्या सिद्धूच्या लग्नाची लगबग सुरु आहे. या कार्यात सुरुवातीपासूनच इतकी विघ्न येताहेत की, माहिती नाही लग्नापर्यंत काय घडेल. सध्या एक मोठा खुलासा होतो जेव्हा सिद्धू आणि पूर्वी एकमेकांना सांगतात की त्यांना हे लग्न करायचंय नाहीये. सिद्धू खुश आहे आणि तो भावनाला सगळं सत्य सांगायचं ठरवतो. त्याचे भावनाला सत्य सांगायचे प्रयत्न सुरू आहेत. इकडे आनंदीला काहीतरी झालंय हे भावनाला जाणवतं. आनंदी सुपर्णाच्या घरी आठवड्याच्या शेवटी जाते, पण आता ती गप्प आणि अस्वस्थ आहे. जेव्हा तिला प्रश्न विचारले जातात, तेव्हा ती टाळाटाळ करते. हे पाहून भावना काळजीत आहे. ती सिद्धूला घरी बोलवते, सिद्धू आनंदीला बोलत करतो. भावनाला वाईट वाटतंय की आनंदी तिच्याशी बोलत नाही, पण सिद्धू तिला समजावतो. (Laxmi Niwas serial)

Laxmi Niwas serial
Instagram

दरम्यान जयंत-जान्हवी त्यांच्या आयुष्यात प्रचंड खुश आहेत. जयंत-जान्हवीला हवं नको ते बघतोय. तर दुसरीकडे जान्हवी सुपरमार्केटला जाते आहे, असं सांगून ती भावनाला भेटायला जाते. हे जयंतला कळतं आणि जान्हवी त्याच्याशी खोटं बोलली याचा त्याला प्रचंड त्रास होतो. श्रीनिवास एरवीपेक्षा वेगळा वागतोय, हे लक्ष्मीच्या लक्षात येतंय. त्याच बरोबर रिक्षेशी निगडीत असलेल्या गोष्टी तिला सापडतात, ती विचारपूस करते पण श्रीनिवास टाळाटाळ करतोय.

Laxmi Niwas serial
Instagram

आता सिद्धूचं सत्य काय बदल घडवेल त्याच्या आणि पूर्वीच्या नात्यात? सत्य समजल्यावर सिद्धू आणि भावनाचं नातं बहरेल? श्रीनिवासचं सत्य लक्ष्मीसमोर आल्यावर काय होईल ? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहा 'लक्ष्मी निवास' रोज रात्री ८ वा. झी मराठीवर. (Laxmi Niwas serial)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news