Satvya Mulichi Satavi Mulgi : केदारचं सत्य सर्वांसमोर येणार!

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' : केदारच्या विरोधात उभी न राहता नेत्राचा शेखरला पाठिंबा
Satvya Mulichi Satavi Mulgi
केदारच्या विरोधात उभी न राहता नेत्राशेखरला पाठिंबा देतेinstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये नेत्रा केदारच्या विरोधात उभी न राहता शेखरला पाठिंबा देते, यामुळे अद्वैत गोंधळलाय. केदार केतकीला मनवून कुटुंबात फूट पाडण्याचा आणि वारंवार मैथिलीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण नेत्रा आणि ईशा त्याचे हे प्रयत्न हाणून पाडतात. केदार अद्वैत आणि शेखरमध्ये सुद्धा भांडण लावण्याचा प्रयत्न करतो. इकडे पण नेत्रा त्याचे डाव उधळून लावते. केदार ईशाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतो, पण चुकून रीमाला यात गोवतो. या सगळ्याचा दोष बंटी नेत्रावर ठेवतो, ज्यामुळे तिच्या आणि रीमामध्ये ताण वाढतो. केतकी नेत्रावर मत्सर करण्याचा आरोप करते आणि अद्वैतला केदारला कंपनीचा सीईओ बनवण्यास प्रवृत्त करते. नेत्रा केदारला इशारा देते, पण केदार तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो.

नेत्राला केदारच्या खोट्या लंगडण्याचा पर्दाफाश करण्यासाठी ईशाची मदत त्याला पळायला भाग पाडते. ज्यामुळे केदारचं खोटं सगळ्यांसमोर येतं. अखेर अद्वैत आणि इंद्राणीला नेत्राच म्हणणं पटत. आता कंपनी केदारच्या ताब्यात असल्यामुळे अद्वैतला आपली जागा परत मिळवण्यासाठी त्यांच्याकडे एकच पर्याय आहे ते म्हणजे तेजस आणि फाल्गुनीला परत आणणं.

अद्वैत, तेजस आणि फाल्गुनीला परत आणू आणेल? काय असेल केदारचा नवीन प्लॅन ? 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' रोज रात्री १०:३० वा. झी मराठीवर पाहता येईल.

Satvya Mulichi Satavi Mulgi
Kiara Advani-Ram Charan : ‘गेम चेंजर’ रिलीज डेट! राम चरण-कियारा आडवाणी घालणार धुमाकूळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news