ऐन दिवाळसणात नेत्रासमोर उलडणार राजाध्यक्ष कुटुंबातलं नवं रहस्य!

Satvya Mulichi Satavi Mulgi | ऐन दिवाळी सणात नेत्रासमोर उलडणार राजाध्यक्ष कुटुंबातलं नवं रहस्य!
Satvya Mulichi Satavi Mulgi
नेत्रासमोर उलडणार राजाध्यक्ष कुटुंबातलं नवं रहस्य! instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका काहीं ना काहीतरी चित्तवेधक आणि मनोरंजक वळण घेत असते. तर सध्या इंद्राणीची शक्तीसुद्धा ईशाकडे आहे हे समजल्यावर नेत्रा आणि अद्वैतमधे यावरून संभाषण होतं. नेत्रा तिची चाललेली धडपड अद्वैतकडे व्यक्त करत सगळं सांगते. अद्वैतला त्याची चूक उमगते. तेंव्हाच घरात चारही बायकांचं एकमत होतं की, घरातल्यांना आपण एकत्र ठेवण्यातच खरा आनंद आहे. जिथे केतकी भरभरून बोलते आणि केतकीचा नवरा केदार घरात प्रवेश करतो. केदारची भूमिका मराठीतला उत्कृष्ट कलाकार अभिजित केळकरने साकारली आहे. या केदारच्या येण्याने मात्र शेखरच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसतात यामागचं गुपित उलगडलेलं नाही. केदारच्या येण्याने घरात सगळे आनंदी असताना, इंद्राणीला शंका येते की शेखर काहीतरी लपवत आहे. ती नेत्राशी बोलते, आणि नेत्रा सावध होते अशावेळी ईशाला दैवी संकेत मिळणार आहे...घरातल्या मैथिलीचा जीव धोक्यात असल्याचा...

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ - काय असेल या मागील प्रयोजन?

केदार वरील संशय आणि संकेतातली व्यक्ती याचा काही ताळमेळ जुळेल का? नेत्रा येणाऱ्या नव्या संकटाशी तोंड देऊ शकेल का?? दिवाळीत अजून कोणतं राज्याध्यक्ष कुटुंबातलं रहस्य उघडीस येणार. यासाठी रोज १०:३० वा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' झीमराठीवर पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news