Satluj Ban Controversy: सतलज ओटीटी प्लॅटफॉर्मवरून गायब होण्यामागं 'भारत विरोधी शक्ती' कारण... दिलजीतच्या पोस्टने गुढ वाढलं?

Satluj Ban Controversy
Satluj Ban Controversypudhari
Published on
Updated on

Satluj Ban Controversy: दिलजीत दोसांजची प्रमुख भूमिका असलेला सतलज हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. मात्र अवघ्या काही दिवसातच झी ५ ने हा चित्रपट आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे. याबाबत सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार सतलजच्या काही भागाचा भारत विरोधी शक्ती गैरवापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळंच दिलजीत दोसांजची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट रिलीजनंतर दुसऱ्याच दिवशी झी ५ ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला.

Satluj Ban Controversy
Mirzapur Actor: 'मिर्झापूर' फेम अभिनेत्याला दिग्दर्शकानेच डांबून ठेवले, थकीत मानधनासाठी मारहाणीची धमकी, मदतीसाठी जोडले हात

या चित्रपटाचे आधीचे नाव हे पंजाब ९५ असं होते. हा चित्रपट गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. अखेर तो सतलज या नावाने झी ५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी रिलीज करण्यात आला. मात्र या चित्रपटाचा काळजीपूर्वक रिव्ह्यू केल्यानंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला.

यापूर्वी या चित्रपटाने चित्रपट गृहात रिलीज करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र नंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. त्यांना थिएटरमध्ये रिलीज करण्याची परवानगी मिळाली नाही. या चित्रपटाच्या काही भागाबाबत शंका व्यक्त करण्यता आली आहे. या भागांचा वापर भारत विरोधी शक्ती गैरवापर करू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

Satluj Ban Controversy
Rahul Vijay Reels Controversy: विजय - राहुल यांचे रील सरकारनं ब्लॉक केले; मंत्रालयानं मान्यही केलं.. मात्र कहानी मैं हैं ट्विस्ट

ओटीटी कंटेटला कोणत्याही सर्टिफिकेशनची गरज नसते. इथं प्लॅटफॉर्म स्वतः रेग्युलेशनबाबत निर्णय घेतात. तसेच सरकारची देखील संवेदनशील कंटेटवर नजर असते.

सतलज हा चित्रपट पंजाबमध्ये दहशतवाद फोफवला होता त्यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर हत्यांसदर्भात आहे.

दरम्यान, झी ५ ने सतलज हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे असं अधिकृतरित्या इन्स्टाग्रामवरून जाहीर केलं आहे. हा चित्रपट भारतात पुढची नोटीस मिळेपर्यंत दिसणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे. झी ५ ने या चित्रपटाला आपला पाठिंबा असल्याचं देखील सांगितलं.

Satluj Ban Controversy
Sreesanth Slapgate scandal: थप्पड प्रकरणातून हरभजनने १ कोटी कमवले... श्रीसंतचा खळबळजनक दावा, नंतर निर्लज्जासारखा फोनही केला

झी ५ आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, 'झी ५ हे सतलज चित्रपटाच्या आणि त्याच्या क्रिएटिव्ह व्हिजनला पाठिंबा देते. एका शक्तीशाली स्टोरीटेलिंगमध्ये प्रेरणा देण्याची आणि मोठा प्रभाव पाडण्याची ताकद असते. आम्ही अधिकृत आणि अर्थपूर्ण चित्रपटांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहोत.'

दरम्यान, दिलजित दोसांज यांनी इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी चित्रपटातील फोटो टाकून त्याला 'मी अंधकाराला आव्हान देतो. जी गोष्ट सतलजबाबत झाली तीच गोष्ट शहीद जसवंत सिंह खारला यांच्याबाबत घडली होती.' असं कॅप्शन दिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news