Mirzapur Actor: 'मिर्झापूर' फेम अभिनेत्याला दिग्दर्शकानेच डांबून ठेवले, थकीत मानधनासाठी मारहाणीची धमकी, मदतीसाठी जोडले हात

'मिर्झापूर' चित्रपटातील अभिनेता सत्येंद्र सोनीला एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने फसवणूक करत त्याला ओलीस ठेवल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mirzapur Actor Satyendra Soni
Mirzapur Actor Satyendra Sonifile photo
Published on
Updated on

Mirzapur Actor Satyendra Soni

मुंबई: 'मिर्झापूर' आणि 'लापता लेडीज' सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता सत्येंद्र सोनी एका मोठ्या संकटात सापडला होता. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने फसवणूक करत त्याला ओलीस ठेवल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सत्येंद्रने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत रडत-रडत मदतीसाठी विनंती केली होती. मध्य प्रदेशातील मैहर येथे हा सगळा प्रकार घडला असून, अखेर पोलीस आणि चाहत्यांच्या मदतीने सत्येंद्रची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

८ दिवस शूटिंग करून घेतले, पैसे मागताच दिली धमकी

अभिनेता सत्येंद्र सोनी हा 'पेड पालकी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मध्य प्रदेशातील मैहर येथे गेला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह करत आहेत. सत्येंद्रने व्हिडिओमध्ये सांगितले की, "दिग्दर्शकाने मला ५० हजार रुपये सायनिंग अमाऊंट दिली होती आणि उर्वरित मानधन शूटिंग सुरू असताना देण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही ८ दिवस सलग शूटिंग केले. मात्र, जेव्हा मी माझ्या हक्काचे पैसे मागितले, तेव्हा दिग्दर्शकाने आमचा 'पॅकअप' केला आणि आम्हाला तातडीने हॉटेल सोडायला सांगितले. इतकेच नाही तर पैसे न देता आम्हाला मारहाण करण्याची धमकीही देण्यात आली."

Mirzapur Actor Satyendra Soni
Bollywood : ओरीवर अभिनेत्रींचा इतका विश्वास का? काय आहे खास.. उर्वशी रौतेलाने दिले थेट उत्तर

सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे मिळाली मदत

दिग्दर्शकाच्या या धमकीमुळे सत्येंद्रने हॉटेलमधूनच एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो प्रचंड घाबरलेला आणि रडताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आणि त्याच्या चाहत्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. अनेकांनी मध्य प्रदेश पोलिसांना टॅग केले. घटनेचे गांभीर्य ओळखून मैहर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत अभिनेत्याची सुटका केली.

"तो मानसिक छळ होता..."; मुंबईत पोहोचल्यावर सुटकेचा श्वास

सुखरूप मुंबईत परतल्यानंतर सत्येंद्रने आणखी एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आणि पोलिसांचे आभार मानले आहेत. रेल्वे स्टेशनवरील या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत सहकलाकार श्रीधर दुबे आणि पंकज दुबे देखील दिसत आहेत. "आम्ही सुरक्षितपणे मुंबईत पोहोचलो आहोत. मैहर पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केले. तो काळ आमच्यासाठी अत्यंत कठीण आणि मानसिक धक्का देणारा होता. दिग्दर्शकाचे वर्तन पाहता, त्याला चित्रपट बनवण्यात रस नव्हता तर त्याचा हेतू काहीतरी वेगळाच होता, असे जाणवत होते. पण आम्ही तिघांनी एकी दाखवली आणि लोकांच्या पाठिंब्यामुळे आम्ही सुखरूप बाहेर पडू शकलो," अशी भावना सत्येंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.

सत्येंद्र सोनी याने किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटात 'छोटू'ची महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच तो आगामी 'मिर्झापूर: द फिल्म'मध्येही झळकणार आहे. आपल्या कमी उंचीमुळे समाजाने टोमणे मारले तरी त्या जिद्दीने चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या सत्येंद्रसोबत घडलेल्या या प्रकारामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

Mirzapur Actor Satyendra Soni
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपटाने सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का; पहिल्या दिवशी किती कमाई केली?
logo
Pudhari News
pudhari.news