

विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते किडनीच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट देखील झाले होते. अनेक सिनेमा, मालिकेतील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट शेयर केल्या आहेत. बिग बी पासून त्यांच्या मालिकेतील सहकारी कलाकारांनीही सतीश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Latest Entertainment News)
आपल्या पोस्टमध्ये बिग बी म्हणतात, ‘आणखी एक दिवस, आणखी एक काम आणि आणखी एक शांतता.. आमच्यातील आणखी एक या जगातून निघून गेला. एक उत्तम प्रतिभा, सतीश शाह अत्यंत कमी वयात या जगातून निघून गेले. या काळात सामान्य आयुष्य जगट राहणे सोपे नाही. पण प्रवाहासोबत गेले पाहिजे. आयुष्य जात राहतेच. ' अमिताभ आणि सतीश शाह यांनी भुतानाथ सिनेमात एकत्र काम केले होते.
जिनीलियानेही सतीश यांना श्रद्धांजलि वाहणारी स्टोरी शेअर केली आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘ माझे पहिले ऑनस्क्रीन डॅड. मी किती नशीबवान आहे की सुरुवातीचे ते दिवस तुमच्यासारख्या खंबीर व्यक्तीसोबत होते. दुखदायक. कुटुंबाला सावरण्याचे बळ मिळो.
सतीश शाह यांचे मित्र जॉनी लिव्हर यांनीही पोस्ट शेयर करत त्यानं श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते लिहितात, आपण एका चांगल्या कलाकाराला आणि 40 वर्षे मैत्री असलेल्या मित्राला गमावले आहे यावर माझा विश्वासच बसला नाही. दोन दिवसांपूर्वीच आमचे बोलणे झाले होते. सतीश भाई, तुमची खूप आठवण येईल. टेलिव्हिजन आणि सिनेमातील तुमचे अमूल्य योगदान कधीही विसरले जाणार नाही.
साराभाई vs साराभाई मालिकेत ऑनस्क्रीन मुलाच्या भूमिकेत दिसलेल्या सुमित राघवननही गंभीर पोस्ट शेयर करत सतीश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘लव्ह यु काका, लव्ह यु डॅड, वी ऑल लव यु अँड मिस यु इंदु.. नारद मुनि'
सतीश शाह यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. साराभाई मालिकेतील कलाकार, नसरुद्दीन शाह, रुपाली गांगुली, डेव्हिड धवन, दिलीप जोशी, नील नितीन मुकेश या कलाकारांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.