सारं काही तिच्यासाठी : निशीला बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याची दादा खोत परवानगी देणार का?

सारं काही तिच्यासाठी
सारं काही तिच्यासाठी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत मध्ये नुकतंच निशी आणि नीरजचा साखरपुडा झालाय. निशी आपल्या फायनल परीक्षेसाठी अभ्यासाला लागलेय. लवकरच निशी परीक्षा संपणार असून तिचं लग्न होईपर्यंतचे जे काही थोडे दिवस उरले आहेत त्यात निशीने घरातल्या गोष्टी शिकून घ्याव्यात, संसाराचे धडे उमाकडे गिरवावेत, असा फतवा दाईचीने काढलाय. पण निशीने बॅडमिंटनचा सराव करावा असं नीरजला वाटतंय. तो निशीला सांगतो की, स्टेट लेव्हलच्या टीमचं सिलेक्शन होणार आहे आणि त्यात तू भाग घ्यावास अशी माझी इच्छा आहे. निशी त्याची समजूत काढते भाग घेतला तर मला प्रॅक्टीस करावी लागेल. त्यासाठी तोकडे कपडे घालावे लागतील जे दादांना आवडणार नाही. लग्नानंतर नवऱ्याच्या किंवा सासरच्यांच्या आवडीनुसार मुलीने राहावं असं दादा म्हणतात. आपलं लग्न झालं की ते मला खेळायला विरोध करणार नाहीत, आत्ता आपण त्यांना दुखवायला नको.

इकडे मेघना निशीसाठी मुंबईला जाऊन खरेदी करायची आहे, असं सांगून निशीला आपल्या सोबत मुंबईला घेऊन जायची परवानगी रघुनाथकडे मागते. दादांचं असं म्हणणं आहे की, एकदा विश्वास टाकलाय, आता पुन्हा मनात शंका घ्यायची नाही. तो मेघनाला निशीला सोबत घेऊन जायची परवानगी देतो. मेघना आणि निशी मुंबईला पोहोचतात आणि मेघना निशीला थेट स्टेट लेव्हल सिलेक्शनसाठी नाव नोंदवायला घेऊन जाते.

आता काय होईल जेव्हा दादा खोतांना ही बातमी कळेल? या गोष्टीसाठी ते मेघनाला माफ करतील? निशीला मुंबईला जाणं महागत पडणार का? मेघनाच्या या गोष्टींनी निशी-नीराजच्या लग्नात काही समस्या येईल का? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' दररोज रात्री ८:३० वा. झी मराठीवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news