Sapna Choudhary | सपना चौधरीने दुसऱ्यांदा दिला मुलाला जन्म, नाव ठेवले...

दुसऱ्यांदा आई झाली हरियाणवी डान्सर सपना चौधरी
Sapna Choudhary welcome baby boy
हरियाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरीने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - हरियाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरीने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. पती वीर साहू आणि सपना चौधरीने मुलाचे स्वागत केल्याचे वृत्त समोर आले आहे. मुलाचे नाव देखील ठेवले असून नामकरण सोहळ्यात ३० हजार लोकांनी उपस्थिती लावल्याचे म्हटले जात आहे.

रिपोर्टनुसार, सपना चौधरीने हरियाणाच्या मदनहेडी गावात आपल्या दुसऱ्या मुलाचा नामकरण समारोह आयोजित केला होता. या सोहळ्यात पंजाबी - हरियाणवी स्टार्सनी हजेरी लावली. रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश ते महाराष्ट्रपर्यंत अनेक लोकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली.

सपना चौधरीच्या मुलाच्या नावाचा खुलासा देखील केला आहे. रिपोर्टनुसार, म्हटले जात आहे की, गायक बाबू मानने सपना चौधरी-वीर साहूच्या दुसऱ्या मुलाचे नाव जाहिर केले आहे. नामकरण सोहळ्यात बाबू मानचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर समोर आले आहे. त्यामध्ये बाबू मान सपनाच्या मुलाचे नाव शाहवीर सांगताना दिसत आहे.

Sapna Choudhary welcome baby boy
Savalyachi Janu Savali | सावली आणि सारंगच्या लग्नाची लगबग सुरु!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news