‘ह्या गोष्टीला नावच नाही’, दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट भेटीला

New Marathi Movie | ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ लवकरच भेटीला
New Marathi Movie
नवा मराठी चित्रपट भेटीला येतोय Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक संदीप सावंत यांनी आपल्या सिनेमांतून आजवर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. ‘श्वास, ‘नदी वाहते’ यासारख्या चित्रपटांमधून चित्रभाषेची प्रगल्भ समज दिग्दर्शक संदीप सावंत यांनी या आधीच दाखवून दिली आहे. मराठी चित्रपट फक्त मनोरंजनातच न अडकता, जगण्यासाठीची प्रेरणा देण्याचे कामही तेवढय़ाच ताकदीने आजवर करत आला आहे. एक-दोन नव्हे तर अशा अनेक चित्रपटांची समृद्ध मालिकाच मराठी सिनेसृष्टीने गुंफली आहे.

डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचं बाळकडू कोणालाच मिळालेलं नसतं, पण कठीण परिस्थितीत माणूस असीम जिद्दीचे तोरण बांधून त्या संकटांवर मात करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, ज्यामध्ये माणसाच्या धैर्याची, चिकाटीची परीक्षा होते. ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटातूनही नैराश्याच्या गर्तेत सापडलेला नायक मुकुंद आपल्या कुटुंबाच्या मदतीने जगण्याला कसा आत्मविश्वासाने सामोरा जातो याची प्रेरणादायी कथा पहायला मिळणार आहे. जयदीप कोडोलीकर, प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे,अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

'

याच मालिकेत दिग्दर्शक संदीप सावंत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून एक सुंदर पुष्प ओवण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या ८ नोव्हेंबरला पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

आयुष्यात दुःख भोगण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीला दुःखात, त्रासात बघणं हे अधिक दुःखदायक असतं, अशावेळी आपलं जीवन अधिक सुंदर करण्याचं सामर्थ्य आत्मसात करणं गरजेचं असतं, हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक संदीप सावंत सांगतात.

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत.

‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद -दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे. साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचे आहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाश जाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर अनुप देव CAS यांचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news