

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूडची एक्स अभिनेत्री सना खानने दुसऱ्यांदा आई झालीय. तिने मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची वार्ता तिने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. सनाने आपल्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. त्याची घोषणा तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केली आहे. सनाने ५ जानेवारीला बाळाला जन्म दिला आहे. सनाने व्हिडिओ शेअर करून आपल्या मनातील गोष्ट लिहिली आहे.
सनाने कॅप्शनमध्ये लिहिलं, अल्लाह तालाने हर चीज मुकद्दर में लिखी है। वक्त आने पर अल्लाह उसको अता करता है और जब अता करता है तो झोलियां खुशियों से भर देता है।
सना खानच्या या व्हिडिओ पोस्टवर फॅन्स अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. एकाने लिहिलं- माशाअल्लाह, बहुत मुबारक हो. आणखी एक फॅनने लिहिलं- 'तुम्हाला शुभेच्छा परमेश्वर तुम्हाला खूप आनंद देवो.'