सलमान खानचे ६० व्या वर्षात पदार्पण, यश, संपत्ती सगळं मिळालं… पण 'एक' इच्छा अजूनही अपूर्ण

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे.
salman khan
सलमान खानचे ६० व्या वर्षात पदार्पण, यश, संपत्ती सगळं मिळालं… पण 'एक' इच्छा अजूनही अपूर्णFile Photo
Published on
Updated on

salman khan turns 60 wants to become single father surrogacy adoption

पुढारी ऑनलाईन :

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार सलमान खान २७ डिसेंबर रोजी त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्‍याच्याकडे आज सर्वस्व असूनही, सलमानला अजूनही एका गोष्टीची सल जीवनात कमतरता जाणवत आहे. एक अपूर्ण इच्छा जी प्रत्येकाला पूर्ण झालेली पाहायची आहे.

salman khan
Jailer 2 | रजनीकांतच्या ‘जेलर 2’मध्ये किंग खानची एन्ट्री?

सलमान खान नावच पुरेसं आहे. सलमानचं नाव जिभेवर येताच मनात अनेक गोष्टींचा विचार सुरू होतो. सलमान हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी सुपरस्टारपैकी एक आहे. 27 डिसेंबर रोजी ‘दबंग’ खान आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त जर त्यांच्या आयुष्याबद्दल बोलायला बसलो, तर कदाचित एक पूर्ण पुस्तक लिहावं लागेल. पण आत्ता तिथपर्यंत जाणार नाही. आज आपण त्याच्या एका अपूर्ण इच्छेबद्दल बोलणार आहोत, जी त्यांच्या चाहत्यांना पूर्ण होताना पाहायची आहे.

मोठी इच्छा अजूनही अपूर्ण

हिंदी सिनेसृष्टीत सलमान खानच चांगलच वर्चस्व आहे. सलमान ज्या व्यक्तीवर आपला हात ठेवतो, त्या व्यक्तीचं नशीब उजळतं, असं म्हटलं जातं. आजच्या काळात लोक त्यांच्याशी पंगा घेण्यास घाबरतात, हेही तितकंच खरं आहे. इंडस्ट्रीत सलमानने जे नाव आणि संपत्ती कमावली आहे, ती त्यांनी पूर्णपणे स्वतःच्या मेहनतीवर मिळवली आहे.

salman khan
Deepika Padukone | गोरे दिसण्यासाठी दीपिकाने केली ट्रीटमेंट?

आज त्याच्या जवळ आलिशान घरं, फार्महाऊस आणि फिरण्यासाठी महागड्या गाड्या आहेत. सलमानकडे इतका पैसा आहे की, तो थाटात आपलं आयुष्य सहज जगू शकतात. सगळं काही असूनही, वैयक्तिक आयुष्यात सलमान स्वतःला थोडं एकटं वाटतं. इंडस्ट्रीत त्यांचे अनेक अफेअर्स झाले. काही वेळा गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली, पण लग्न होऊ शकलं नाही.

सलमानला या गोष्टीचा अजिबात पश्चात्ताप नाही की, त्यांच लग्न झालं नाही. मात्र, तो वडील बनण्याची इच्छा नक्कीच बाळगतो. भाचा अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये सलमानने मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ट्विंकल खन्ना आणि काजोल यांच्या शोदरम्यानही सलमान खानने सांगितलं होतं की त्याला वडील व्हायचं आहे. तो म्हणाला होता, “एक दिवस मी नक्कीच वडील बनेन. ते मूल माझंच असेल.” मुलाचं संगोपन करण्यासाठी त्यांच्या घरी अनेक महिला सदस्य आहेत.

सलमानचं असंही म्हणणं आहे की सिंगल फादर होण्यासाठी ते सरोगसीचा पर्याय स्वीकारू शकतात. त्यांनी हेही सांगितलं होतं की त्यांनी मूल दत्तक घेण्याचा विचार केला होता, पण ते शक्य होऊ शकलं नाही. कारण मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया खूप कठीण असते आणि त्यासाठी बराच वेळ लागतो.

सलमान वडील बनून आपल्या मुलाचं उत्तम प्रकारे पालनपोषण करायची इच्छा व्यक्त करतो. मात्र त्याच्या आयुष्यात तो दिवस नेमका कधी येईल, याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news