Salman Khan: ‘सलमान खान घाबरला...’ मध्यरात्रीच्या ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ

अभिनेता सलमान खानने गुरुवारी मध्यरात्री अचानक अशी एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Salman Khan
Salman KhanSalman Khan Instagram
Published on
Updated on

Salman Khan

मुंबई: अभिनेता सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सक्रिय झाला असून विविध सामाजिक विषयांवर आपली मते मांडत आहे. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावर सलग दोन पोस्ट करून चर्चेत आलेल्या सलमानने गुरुवारी मध्यरात्री अचानक अशी एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

“जो डर गया समझो...” जिममधील फोटो आणि कॅप्शन

मध्यरात्री सलमान खानने सोशल मीडियावर स्वतःचे दोन फोटो शेअर केले. यात तो जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत असून त्याच्या डोक्यावर पांढरा रुमाल आणि चेहऱ्यावर प्रचंड राग पाहायला मिळत आहे. या शर्टलेस फोटोपेक्षाही त्याच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फोटो शेअर करत सलमानने लिहिले, "सलमान खान घाबरला... हम्म्म्म्म जो डर गया वो मर गया." त्याच्या या गूढ कॅप्शनमुळे सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Salman Khan
Mohan Bhagwat: नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांच्याशी संवाद साधा; मोहन भागवत यांचे मोठे विधान

चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी काळजी व्यक्त करत, "भाईजान, सर्व काही ठीक आहे ना?" अशी विचारणा केली आहे. तर एका चाहत्याने लिहिले, "सलमान भाई, तुम्ही कोणालाही घाबरत नाही हे जगाला माहित आहे. 'भय' हा शब्द तुमच्या शब्दकोशातच नाही." अशा अनेक कमेंट आहेत.

नीट प्रकरणावरील पोस्टमुळे झाला होता ट्रोल

सलमान खानने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, त्याने लिहिले की, "विद्यार्थ्यांचे शिक्षण असो वा त्यांची सुरक्षा, तेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी अजिबात काळजी करू नये. पंतप्रधानांनी ट्विट केले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की, पेपरफुटीस जबाबदार असलेल्या सर्वांवर ते कठोर कारवाई करतील. त्यामुळे, सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी परत जावे आणि पालकांसोबत राहावे. सोनम, आता हे प्रकरण संपले आहे; कृपया या विषयाला पुढे वाढवू नका. भविष्यात गरज पडल्यास आपण पुन्हा लढा देऊ. अर्थात, तशी गरज पडेल असे मला वाटत नाही. आता काहीतरी खाऊन घे. तुला हवे असल्यास, मी माझ्या घरून तुझ्यासाठी जेवण पाठवू शकतो."

Salman Khan
PM Narendra Modi youth message : ‘थँक्यू फ्रेंड्स...!’ पंतप्रधान मोदींचा तरुणांना पुन्हा एक खास संदेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news