

पुढारी ऑनलाईन डेस्क : बजरंगी भाईजान (२०१५) मध्ये रिलीज झाला होता. आता या सुपरहिट चित्रपटाचे सीक्वल येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी सलमानने एका खास व्यक्तीची भेट घेतली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अशी चर्चा होत आहे की, 'बजरंगी भाईजान-२'वर बातचीत सुरू केली आहे. आता बजरंगी भाईजान-२ ची कथा काय असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
२०१५ मध्ये बजरंगी भाईजान रिलीज झाला होता. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता आणि सलमानच्या करिअरच्या बेस्ट चित्रपटांपैकी एक मानले जाते. आता बजरंगी भाईजान-२ बद्दल रिपोर्टनुसार, “सलमानने काही दिवस आधी विजयेंद्र प्रसाद यांची भेट घेतली होती. या प्रोजेक्टमध्ये दिग्दर्शक कबीर खान देखील असतील, असे म्हटले जात आहे. सलमान, विजयेंद्र प्रसाद आणि कबीर खान यांचे त्रिकुट पुन्हा एकदा सोबत येऊ शकतं. पण अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही.”