Marathi Movie Sakhe Gan Sajani | प्रार्थना बेहेरेचा 'सखे गं साजणी' येतोय भेटीला; पोस्टरमध्ये दिसणारे कलाकार नक्की कोण?

Prarthana Behere Marathi Movie Sakhe Gan Sajani | प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यांच्या रेडबल्ब प्रॉडक्शन हाऊसचा ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
image of Movie Sakhe Gan Sajani poster
Sakhe Gan Sajani upcoming Marathi movie Instagram
Published on
Updated on

Prarthana Behere Marathi upcoming Movie Sakhe Gan Sajani

मुंबई - सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती म्हणजे 'सखे गं साजनी' या नव्या चित्रपटाच्या पोस्टरची. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब प्रॉडक्शन’ हाऊस मार्फत हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने यापूर्वी या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

image of Prarthana Behere
Prarthana BehereInstagram

हे फोटो शेअर करत तिने त्यांच्या 'रेडबल्ब प्रॉडक्शन' हाऊसचा नवा चित्रपट येणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर आता अभिनेत्रीने चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर शेअर करत चित्रपटाची अधिकची माहिती दिली आहे. समोर आलेल्या पोस्टरवरील पाठमोऱ्या उभ्या असलेल्या कलाकारांनी अर्थातच चित्रपटाची उत्सुकता वाढविली आहे. नेमका हा चित्रपट काय आहे, यात कोण असणार आहे हे समोर आलेल्या पोस्टरवरून स्पष्ट होत नाही त्यामुळे साऱ्या प्रेक्षकांमध्ये एकूणच याची उत्सुकता रंगली आहे.

image of Movie Sakhe Gan Sajani poster
Neena Gupta | करीनाच नव्हे नीना गुप्तांनाही आवडते कोल्हापुरी चप्पल, लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिली होती भेट

'सखे गं साजणी' चित्रपटाच्या पोस्टरने खरंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. समुद्र किनारी हे तीन मित्र म्हणजेच दोन मुली आणि एक मुलगा पाठमोरे उभे असून त्यांनी हाताने हार्ट ईमोजी केलेला पाहायला मिळत आहे. चित्रपटातील हे तीनही कलाकार पाठमोरे असल्याने त्यांचे चेहरे दिसत नसल्याने चित्रपटात नेमकं कोण दिसणार आहे याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे. अर्थात या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे अस्पष्ट आहे. शिवाय कथा नेमकी काय असणार हे देखील गुलदस्त्यात आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित हा 'सखे गं साजणी' चित्रपट असणार आहे.

image of Movie Sakhe Gan Sajani poster
Panchayat Season 5: पंचायत 5 साठी तयार आहात? मेकर्सनी जाहीर केली नव्या सीझनची तारीख

चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अभिषेक जावकर, आदित्य वासुदेव घरत यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून अभिजीत खांडकेकर आणि अभिषेक दिलीप वाकचौरे यांनी बाजू सांभाळली आहे. संगीत विजय भटे यांचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news