Sajana Movie | रोमँटिक सिनेमा येतोय.. 'सजना' लवकरच भेटीला

शशिकांत धोत्रेंचा पहिलाच रोमँटिक सिनेमा 'सजना' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Sajana Movie
Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - चित्रपटसृष्टीने नेहमीच विविध रोमँटिक कथांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. विशेषतः तरूण-तरुणींच्या हृदयावर अधिराज्य हे रोमँटिक कथांनीच गाजवलं आहे. सिनेसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कथांसह प्रयोग केले आहेत. परंतु प्रेमकथा नेहमीच चित्रपटांचा आत्मा राहिल्या आहेत.

रोमँटिक चित्रपट 'सजना' आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. धोत्रेंच्या चित्रांसारखंच हे पोस्टरसुद्धा एक सुंदर पेंटिंगच आहे. जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचे जिवलग मित्र प्रमोद कुर्लेकर यांनी तयार केले आहे. ज्यात दोन प्रेमी पाण्यांवर तरंगत आहे, आजूबाजूला असलेल्या संपूर्ण जगाचा जणू त्यांना विसर पडलाय; "सजना" सिनेमाच्या टिझर मध्येही ह्याच जोडप्याला आपण रोमँटिक संवाद साधताना पाहू शकतो.

विशेष म्हणजे टीझर मधील प्रत्येक शॉट लक्षवेधी असून पेंटींग प्रमाणेच बारकाईने चितारलेले वाटतात, तरुण फ्रेश जोडी या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. त्यांचा चेहरा टिझरमध्ये अद्याप पूर्णपणे उघड केला गेला नाही आहे. टिझर मध्ये सुंदर पेंटीगसारख्या व्हिज्युअल्स सोबतच कर्णमधूर असं स्वरूपचं संगीत आणि सोनू निगमचा आवाज आहे, जे नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित ही प्रेमकथा असून गावातील सुंदर दृश्य आणखी शोभा वाढवते. टिझरच्या शेवटी प्रेमापोटी एकमेकांमध्ये गुंतलेल्या जोडप्याला कोणते परिणाम भोगावे लागतात. याबद्दलची ही छोटी झलक पहायला मिळते. त्यामुळे नक्की चित्रपटाची कथा काय असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. टिझरमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 'सजना' सिनेमा २३ मे २०२५ ला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'सजना' चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे. ते रोमँटीक कथेच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news