Sai Pallavi | साई पल्लवीवर का होत आहे टीका? नेटिझन्स म्हणताहेत 'बॉयकॉट'

Sai Pallavi Controversy | 'साई पल्लवी 'सीता' बनण्यासाठी लायक नाही...'
Sai Pallavi Ccontroversy
साई पल्लवीवर नेटिझन्सनी निशाणा धरला आहे instagram
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क - साऊथ अभिनेत्री साई पल्लवीवर काही नेटिझन्सनी राग व्यक्त केला आहे. तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तिने देशाविरोधात कॉमेंट केलेले दिसते. त्यावरून नेटिझन्स तिचे चित्रपट 'बॉयकॉट' करण्याची मागणी करत आहेत. (Sai Pallavi Controversy)

साई पल्लवीचा व्हिडिओ व्हायरल

शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवीचा चित्रपट 'अमरन' दिवाळीच्या औचित्याने चित्रपटगृहात रिलीज होत आहे. हा चित्रपट मेजर मुकुंद वरदराजन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. पण आता, साई पल्लवीच्या जुन्या मुलाखतीच्या व्हिडिओमुळे ती वादात सापडली आहे. तिने देशाबद्दल कॉमेंट केले होत, त्यावरून तिच्यावर जोरदार टीका हो आहे. तर लोक तिच्या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी करत आहेत. (Sai Pallavi Controversy)

व्हायरल व्हिडिओमध्ये काय म्हणाली साई पल्लवी?

'विराट पर्वम' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान साई पल्लवीने मोठे वक्तव्य केले होते. तो व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 'आमची भारतीय सेनेला पाकिस्तान दहशतवादीच्या रूपात पाहतो आणि त्यचप्रकारे पाकिस्तानमध्ये राहणारे लोक आमच्या भारतीय सैनिकांना दहशतवादी समजतात. त्यांना वाटतं की आम्ही त्यांचे नुकसान करत आहोत. हे सर्व तुमचा दृष्टीकोण सांगतो.'

कॉमेंट केल्याने वादात सापडली साई पल्लवी

साई पल्लवीने व्हायरल व्हिडिओमध्ये केलेल्या कॉमेंटने नेटिजन्स अजिबात खुश नाही. ते हे देखील म्हणत आहेत की, 'अमरन' आणि 'रामायण' यासारख्या चित्रपटाचे भाग बनण्यासाठी लायक नाही. तिच्या मुलाखतीचे क्लिप एक्सवर व्हायरल होत आहे आणि अमरन देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Sai Pallavi Ccontroversy
Mirzapur The Film | ‘मिर्जापुर द फिल्म’ सोबत मोठ्या पडद्यावर येत आहे 'कालीन भैया'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news