Saba Qamar : सलमान तर खूपच ‘छिछोरा’!

Saba Qamar
Saba Qamar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिने इरफान खानसोबत 'हिंदी मीडियम' या चित्रपटात काम केले होते. आता एका टॉक शोचा थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २०१५ मध्ये सबा पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये सहभागी झाली होती. शोच्या एका एपिसोडवेळी, तिला रणबीर कपूर, रितेश देशमुख, हृतिक रोशन, इम्रान हाश्मी आणि सलमान खानचे फोटो दाखवले. सलमानचा फोटो पडद्यावर आल्यानंतर सबाने त्याला 'छिछोरा' असे संबोधले होते.

शोत सबाला टास्क देण्यात आला की, तिला कोणत्या परिस्थितीत या कलाकारांसोबत काम करायला आवडणार नाही आणि त्याचे कारणही तिला द्यावे लागेल. तिला इम्रान हाश्मीचा फोटो दाखवला असता तिने लगेच नकार दिला. रणबीरचा फोटो पाहिल्यानंतर ती म्हणाली, मी ऐकले आहे की त्याचे दीपिका पदुकोणसोबत अफेअर आहे, त्यामुळे नाही. सलमानचा फोटो पाहिल्यानंतर सबा म्हणाली, अल्लाह माफ करे, लेकीन सल्लू भैया से बहुत डर लगता है. तो स्वतःच्या डान्स स्टेप्स करतो. तो खूपच छिछोरा आहे. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल होताच सलमानच्या चाहत्यांनी सबाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news