Saara Kahi Tichyasathi : चारुचं खोटं सर्वांसमोर येणार, ओवी करणार मोठा खुलासा!

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निकिता नीरज आणि निशीच्या नात्यात तणाव?
Saara Kahi Tichyasathi
चारुचं खोटं सर्वांसमोर येणारInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निकिता नीरज आणि निशीच्या नात्यात तणाव निर्माण करतेय. मुंबईतील एका हॉटेलमधून एक कागद सापडतो, तो कागद ओवीच्या हाती लागतो. ओवी विजयला मुंबईत माहिती गोळा करण्यास सांगते आणि लॅब असिस्टंटकडून खरे रिपोर्ट्स मागवते. दुसरीकडे श्रीनु आणि चारू यांचा हळदी समारंभ सुरु असताना ओवी पुरावे गोळा करण्याच्या कामात गुंतलेली आहे. ओवी आपल्या सापळ्यात डॉक्टरला अडकवते आणि ती श्रीनु आणि चारूच्या लग्नाला हजर होते.

ओवी डॉक्टरला घेऊन येते, तर विजय हॉटेल मॅनेजरला घेऊन येतो, ज्यामुळे चारुचं खोटं सर्वांसमोर येतं. आता चारू आणखी काय नवीन डाव टाकेल? ओवी आणि श्रीनु परत एकत्र येतील का? श्रीनु समोर चारूच सत्य आल्यावर तो काय करणार हे सगळं पाहण्यासाठी ' सारं काही तिच्यासाठी' सोमवार ते शनिवार रात्री ६:३० वा. झी मराठीवर पाहता येईल.

Saara Kahi Tichyasathi
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news