Rukhwat Movie | संतोष जुवेकर-प्रियदर्शिनी इंदलकरच्या "रुखवत" चित्रपटाचा ट्रेलर लाँच

संतोष जुवेकर-प्रियदर्शिनी इंदलकरच्या "रुखवत" चित्रपटाचा ट्रेलर लाँच
Santosh Juvekar - Priyadarshini Indalkar
संतोष जुवेकर-प्रियदर्शिनी इंदलकरच्या "रुखवत" चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट ग्रुपद्वारे प्रस्तुत आणि राबरी एन्टरटेन्मेंटने द्वारे निर्मित रुखवत हा चित्रपट १३ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 'लगीन सराई' हे गाणं देखील भेटीला आले आहे.

या चित्रपटाची सुरुवात पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या ग्रुपची आहे, जे शैक्षणिक सहलीसाठी एका विशाल आणि प्राचीन वाड्यात जातात. वाडा फिरत असताना संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंडालकर यांना त्या ठिकाणी जुने रुखवत दिसते. जवळ जाऊन पाहताच त्यांना त्यातील बाहुल्यांमधून बांगड्यांचे, हसण्याचे, आणि इतर गूढ आवाज ऐकू येतात. त्या वाड्याचा इतिहास काय आहे? त्यात मांडलेल्या रुखवतचे रहस्य काय? बाहुला-बाहुलीचे आवाज ऐकू येण्यामागचे कारण नक्की काय? वाड्यात फिरताना येणारे आवाज व होणारे भास या मागचं कारण काय? या सगळ्याचा उलगडा दोघे मिळून कसा करतात याची जुगलबंदी या चित्रपटामध्ये पहायला मिळेल. चित्रपटाची निर्मिती ब्रिंदा अग्रवाल तर विक्रम प्रधान यांनी दिग्दर्शन केले आहे.

सोनू निगम-बेला शेंडे यांचे 'ऋतु प्रेमवेडा' गाणे रिलीज

या चित्रपटामधील नवीन गाणं 'ऋतु प्रेमवेडा' हे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. सोनू निगम आणि बेला शेंडे यांनी स्वरसाज दिली आहे. गौरव चाटी यांचे संगीत तर विक्रांत हिरनाईक यांचे बोल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news