या दिवाळीला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या दिवाळीला सिंघम अगेन आणि भूलभुलैय्या हे सिनेमे रिलीज झाले आहेत. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित अशी दमदार स्टार कास्ट असलेल्या सिनेमाला दिवाळीच्या मुहूर्तावर चांगले ओपनिंग मिळाले आहे. हॉरर कॉमेडी प्रकारात असलेल्या या सिनेमाला प्रेक्षक गर्दी करत आहेत. या सिनेमाने दोन दिवसात 72 कोटींचा गल्ला जमवला आहे.
तर रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील पुढचा सिनेमा सिंघम अगेन ही या शुक्रवारी रिलीज झाला आहे. अजय देवगण, अक्षयकुमार, रणवीर सिंग, करीना कपूर, दीपिका पडूकोण, जॅकी आणि टायगर श्रॉफ, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाची मेजवानी रोहित शेट्टी घेऊन आला आहे. शनिवारपर्यन्त या सिनेमाने जवळपास 41 कोटींचा गल्ला जमवला होता. तर आतापर्यंत 85 कोटी इतकं या सिनेमाचे कलेक्शन झाले आहे. आजचा रविवार या दोन्ही सिनेमांसाठी निर्णायक ठरू शकतो.
या सिनेमाचे बजेटही जवळपास 350 कोटींचे आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे दीपिका पडूकोण आणि टायगर श्रॉफ हे प्रथमच रोहित शेट्टी कॉप युनिव्हर्सचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा संदर्भ घेत बनवलेल्या या सिनेमात अॅक्शन मात्र ठासून भरली आहे.
4 मिनिटांच्या या सिनेमाच्या ट्रेलरने सिनेमाच्या पटकथेची कल्पना सगळ्यांना आली होती. आता या सिनेमातील मसाला प्रेक्षकांना कितपत सिनेमागृहाकडे खेचू शकतो हे लवकरच कळेल.