Ishq Vishk Rebound Movie : रोहित सराफचा “इश्क विश्क रिबाउंड” यादिवशी रिलीज होणार

रोहित सराफ
रोहित सराफ

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्याची सगळ्यांना उत्सुकता असा "इश्क विश्क रिबाउंड" (Ishq Vishk Rebound Movie) या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. अभिनेता रोहित सराफ यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित या चित्रपटात रोहित सराफसह पश्मिना रोशन आणि जिब्रान खान हे खास कलाकार दिसणार आहेत. (Ishq Vishk Rebound Movie)

संबंधित बातम्या –

रोहितने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही खास बातमी त्याच्या फॅन्सला दिली आहे. "इश्क विश्क में कन्फ्युजन हो सकता है, लेकीन ये announcement एकदम क्लियर है♥️ #IshqVishkRebound #PyaarKaSecondRound २८ जून रोजी थिएटरमध्ये! असे त्याने म्हटले आहे.

२००३ मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'इश्क विश्क' च्या सिक्वेलमध्ये रोहितला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात रोहित सराफची अष्टपैलुत्व आणि अभिनय कौशल्य नक्कीच बघायला मिळतील. रोहित सराफ चा "इश्क विश्क रिबाउंड" प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news