रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडिओ केला पोस्ट

विलासराव देशमुख
विलासराव देशमुख

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळा अभिनता रितेश देशमुखने त्यांचे वडील आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्याने Remembering my father Shri #vilasraodeshmukh अशी कॅप्शन लिहिली आहे. हा विलासरावांचा काँग्रेसवरील भाषणाचा व्हिडिओ आहे. 'भारत जोडो' यात्रेत रितेश देशमुख न दिसल्याने त्याच्यावर टीका झाली होती.

विलासराव देशमुख व्हिडिओमध्ये काय म्हणाले होते?

'लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस. इतकं विस्तारीत रुप काँग्रेसला प्राप्त झालं. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे. ते संपले पण काँग्रेस संपला नाही. एवढा प्रचंड इतिहास काँग्रेसचा आहे. त्यागाचा, बलिदानाचा. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे. काँग्रेसने नेहमी गरिबांचा विचार केलेला आहे. आजही काँग्रेसचा हात आम आदमी के साथ ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसने हात केवळ श्रीमंतासोबत आहे, असे कधी म्हटले नाही. आम म्हणजे समाजातील प्रत्येक जाती-धर्मातील एक माणूस. महिलांचा सन्मान वाढवण्याचे काम काँग्रेसने केलं. कालपर्यंत ३३ टक्के आरक्षम होतं, आज ५० टक्के झालं. आज आमच्या भगिनी जिल्हा परिषद, नगरपरिषद, कार्पोरेशन याठिकाणी जेवढी लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना स्थान प्राप्त करून देण्यात आले. काँग्रेस कामाच्या आधारवर मते मागतात. केलेल्या कामाच्या आधारावर आम्ही उजळ माथ्याने मते मागतो.'

रितेश देशमुखबाबत काय झाली होती टीका?

रितेश देशमुखने काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये सहभागी झालेल्या अनुयायींमध्ये एक जण त्याचे वडील विलासराव देशमुख यांचा फोटो उंचवताना दिसत होता. रितेश देशमुखने ट्विटरवर फोटो शेअर करत या फोटोसोबत तीन हार्ट इमोजी शेअर करत कॅप्शन लिहिली होती. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे १४ वे मुख्यमंत्री होऊन गेले. या पोस्टवर अनेई फॉलोअर्सने कॉमेंट केले. महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या या यात्रेत रितेशने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. एका युजरने लिहिलं होतं की, "रितेश देशमुख आपण कुठे आहात..?? आता हिंमत दाखवण्याची वेळ आलीय."

काँग्रेसने १३ लोकसभेच्या जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा मोठा बदल आहे. काँग्रेसने इतक्या जागा मिळवत पुन्हा कमबॅक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news