

मुंबई - आज आपण पाहतो की, चित्रपट असो वा टीव्ही मालिका, ज्याचे अनेक रिमेक किंवा सीक्वल येत आहेत. रीबूट, रिवायव्हल, रिमेक अथवा सिक्वेल यांची चलती सध्या कलाविश्वात अधिक असल्याचे दिसते. अनेक स्ट्रीमिंग शोच्या जुन्या कहाणींवर नवा दृष्टिकोन टाकून ते पुन्हा नव्याने प्रेक्षकांसमोर सादर केले जाते. पण रीबूट, रिमेक किंवा सिक्वेल म्हणजे काय? आता यापुढे जाऊन रिमेक्वेल आणि रीबूटक्वेलचा जमाना आला आहे, नेमकी ही संकल्पना काय आहे, हे जाणून घेऊया.
ओरिजिल चित्रपटांच्या अनेक फ्रेंचायजी काढल्या जात आहे. अगदी चार-पाच भागापर्यंत चित्रपटाच्या फ्रेंचायजी चालवल्या जातात. डिज्नी स्टार वार्स प्रोडक्शन्स आणि त्यांचे क्लासिक एनिमेटेड चित्रपटांचे लाईव्ह-ॲक्शन रीमेक उदाहरण म्हणून सांगता येईल.
मागील काही दशकांत चित्रपट किंवा शो च्या नव्या एडिशनचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला गेलाय. पण अनेक रीबूट आणि रिमेक या दोन्ही संकल्पना एकच असाव्यात, असेही म्हटले जाते. आता बरेच प्रेक्षक तो चित्रपटाच्या रीमेकिंगसाठी समानार्थी शब्द म्हणून देखील वापरतात. पण, रीबूट आणि रिमेक दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. "रीबूट" हा मूळतः जुन्या चित्रपटाची कहाणी पूर्णपणे रीसेट करणे होय. रीबूट सहसा एकाच चित्रपटाऐवजी फ्रँचायजीचा संदर्भ देते आणि त्यात अशी कथा असते जी मालिकेच्या मागील सर्व किंवा काही नोंदी पूर्णपणे बदलते. कथानकाचे मुद्दे, पात्रे किंवा ठिकाणे कथेच्या किंवा मालिकेच्या जुन्या आवृत्तीसारखे असू शकतात.
परंतु रीबूट केलेली आवृत्ती सहसा पूर्णपणे नवीन असते, ज्याचा पूर्वीच्या गोष्टींशी फारसा संबंध नसतो. २०११ मध्ये राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्सने सुरू झालेले प्लॅनेट ऑफ द एप्स चित्रपट आणि डार्क युनिव्हर्स फ्रँचायझी, द ममी (२०१७) असे काही उदाहरण म्हणून देता येतील.
चित्रपटासाठी हा शब्द कमी वापरला जातो. पण टेलिव्हिजन किंवा स्ट्रीमिंग मालिकांबद्दल रिव्हायव्हल शब्द अनेकदा आढळतो. हे रीबूटच्या अगदी विरूद्ध आहे. मागील कथेकडे दुर्लक्ष करून ती पुन्हा नव्याने सांगणे किंवा सादर करणे होय. प्रेक्षकांना माहिती असलेल्या कहाणीच्या घटनेनंतर तिचं कहाणी पुढे सुरू ठेवणे. रोझेन (Roseanne/द कॉनर्स, नेटफ्लिक्सची सीरीज फुलर, beloved sitcom Full House ही उत्तम उदाहरणे देता येईल.
हॉलीवूडमध्ये फ्रेंचायजींना रीबूट करणे आणि टीव्ही सीरीज रिव्हायव्हल करण्याआधी ते क्लासिक चित्रपटांचे रीमेक बनावायचे. रिमेकचा सर्वात सोपा अर्थ आधी पासून दाखवण्यात आलेल्या कथेची नवी दुसरी आवृत्ती. रिमेकमध्ये पूर्णपणे नव्या गोष्टींचा समावेश करू शकतो. किंवा मूळ कहाणीच्या जवळपास गोष्टी दाखवू शकतात. हे सर्व स्टुडिओ आणि क्रिएटिव्ह टीमवर अवंलबून राहतं. रिमेकचे एक उत्तम उदाहरण म्हणजे-किंग कॉन्ग (१९३३). १९७० च्या दशकापासून कमीत कमी याचे दोन रीमेक बनले आहेत. प्रसिद्ध रीमेक डिज्नीची ॲनिमेटेड चित्रपटांचे लाईव-ॲक्शन ब्लॉकबस्टर ज्यामध्ये ब्युटी अँड द बीस्ट (२०१७), द लायन किंग (२०१९) आणि अन्य अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
सीक्वलचा अर्थ आहे एखादा चित्रपट, पुस्तक वा अन्य कुठल्याही कलाकृतीचा दुसरा भाग वा कडी, जे आधीपासून त्याच कहाणीवर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या कहाणीचा पुढील टप्पा होय.
मूळ फ्रँकेन्स्टाईन (१९३१) आणि जंगल क्रूझ (२०२१) सारख्या अलीकडील चित्रपटांचे सिक्वेल आले आहेत किंवा येतील. प्रसिद्ध उदाहरण म्हणजे स्टार वॉर्स होय, ज्याने १९८० पासून कमीत कमी पाच एपिसोडिक सिक्वल आणि तीन प्रीक्वेल तयार केले आहेत.
आता असे काही चित्रपट आले आहेत, ज्यांची रिबूट की रिमेक, ही व्याख्या स्पष्ट करणे कठीण गेलं आहे. कारण हॅलोविन (२०१८) सारखा चित्रपट सिक्वेल आणि रीबूट हे अस्पष्ट ठरले होते. तो तांत्रिकदृष्ट्या रीबूट आणि सिक्वेल दोन्हीही आहे. अशा चित्रपटांचे वर्णन करण्यासाठी "रीबूटक्वेल" सारखे शब्द येऊ लागले आहेत आणि २०११ मध्ये "राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स" च्या रिलीजसह "प्रीबूट" हा शब्द आता लोकप्रिय झालाय.
आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे "लेगसी सिक्वेल". यालाच "रीमेकक्वेल" असेही म्हणतात. मूळच्या फ्रँचायजींमध्ये आधीच सांगितलेल्या कथेचे रिव्हायव्हल करतात. याच उदाहरण म्हणजे स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स (स्टार वॉर्स: रिटर्न ऑफ द जेडीचा सिक्वेल, स्टार वॉर्स सीरीजचे रिव्हायव्हल. तथापि, स्टार्स वॉर्स अ न्यू होपच्या जवळपास जाणारा रिमेक) तसेच जुरासिक वर्ल्ड (जुरासिक पार्क III चा सिक्वेल, रिव्हायव्हल/रीबूट). अशा परिस्थितीत हॉलिवूडमधील आलेले कोणते सीरीज, कोणते चित्रपट, शोज, मालिका रीबूट केले गेले आहेत वा रिव्हायव्हल केले गेले आहेत किंवा रिमेक केले आहेत, ते परिभाषित करणे कठीण होत आहे.