रश्मिकाचं मराठी प्रेम..म्हणाली, 'साईबाबांच्या चरणी येऊन खूप छान वाटलं..'

Rashmika Mandanna-Vicky Kaushal Shirdi | विकी कौशल-रश्मिका मंदाना शिर्डीत साईबाबांच्या चरणी
Rashmika Mandanna-Vicky Kaushal Shirdi
विकी कौशल-रश्मिका मंदाना शिर्डीत साईबाबांच्या चरणी पोहोचलेShree Saibaba Sansthan Trust
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बहुचर्चित छावा सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिर्डीला साईमंदिरात पोहोचले. साईंच्या मध्यान्ह आरतीनंतर दोघांनी साई समाधीचे दर्शन घेतलं. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित छावा सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. छावा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला रिलीज होतोय.

विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलीय तर रश्मिका मंदाना सिनेमात महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छावाच्या संपूर्ण टीमने कंबर कसल्याचं दिसून येत असून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकी कौशल आणि रश्मिका मंदाना देव दर्शन करताना दिसताहेत.

रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली असतानाही ती आणि विकी कौशल शिर्डी साई मंदिरात पोहचले. यावेळी पूर्ण रस्त्यात विकीने रश्मिकाचा हात पकडत तिला सहारा दिल्याचे दिसून आले. अलिकडेच विकी कौशल घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरात पोहोचले होते. आज या जोडीने शिर्डीत येऊन साई दर्शन घेतले.

यावेळी बोलताना विकी कौशल याने प्रथमच शिर्डीला आल्याचे सांगत जीवनात काहीही सुरवात करताना देवाचे आशीर्वाद महत्वाचे असल्याच सांगितले. तर रश्मिकाने देखील खूप छान वाटल्याचे मराठीत सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news