छावा ट्रेलर लॉन्चिंगवेळी भावूक झाली रश्मिका., म्हणाली - महाराणी येसूबाई यांच्या...

Rashmika Mandanna | ChhaavaTrailer लॉन्चिंगवेळी भावूक झाली रश्मिका., म्हणाली - महाराणी येसूबाई यांच्या...
Rashmika Mandanna - Vicky Kaushal ChhaavaTrailer
अभिनेत्री रश्मिका मंदाना एअरपोर्टवर व्हीलचेयर बसून आली होतीInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'छावा'च्या ट्रेलर लॉंचिंग सोहळ्याआधी विक्की कौशलने दादरमधील सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री रश्मिका मंदाना एअरपोर्टवर व्हिलचेअरवर बसून आली होती. ती थोडीशी लंगडत ट्रेलर लॉन्चला पोहोचली. सलमान खानचा आगामी सिनेमा 'सिकंदर'च्या शूटिंग दरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली होती. तरीदेखील ती ‘छावा’च्या ट्रेलर लॉन्चला पोहोचली. ‘छावा’ हा सिनेमा १४ फेब्रुवारीला सिनेमागृहात आपल्या भेटीस येतोय.

रश्मिका मंदानाने यावेळी लाल रंगाचा आऊटफिट घातला होता तर विक्की कौशल देखील पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसला.

रश्मिका मंदाना भावूक 

छावा ट्रेलर लॉन्चवेळी रश्मिका मंदाना खूप भावूक झाली. तिने या सिनेमात महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारलीय.

दक्षिणेतील एका मुलीला महाराष्ट्राची महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारायला मिळाली, हे माझ्यासाठी एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मी यासाठी दिग्दर्शक लक्ष्मण सरांना धन्यवाद देते.

अभिनेत्री रश्मिका मंदाना

बॉलीवुड अभिनेता विक्की कौशलचा बहुचर्चित सिनेमा 'छावा'चा ट्रेलर भेटीस आला. या ट्रेलरमध्ये विक्की कौशलचा अंगावर शहारे आणार लूक बाघायला मिळाला. ३ मिनिट ८ सेकेंडच्या ट्रेलरमध्ये विक्की कौशलची घोडेस्वारीपासून ते तलवारबाजी करताना दिसतोय. तर दुसरीकडे अक्षय खन्नाचा कधी पाहिलेला अवतार प्रेक्षकांना हैरान करून टाकणारा आहे. छत्रपतींच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली अष्टपैलू रश्मिका मंदाना, स्वराज्याची महाराणी, महाराणी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसतेय.

‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरमधला विक्कीचा आवाज, आक्रोश, डायलॉग्ज उत्सुकता वाढवतोय. आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता आपल्या या सिनेमात पाहिला मिळणार असून मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर देखील या सिनमात झळकणार आहे. ‘छावा’ या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून मॅडॉक फिल्म्स अंतर्गत ही फिल्म आहे. या सिनेमाचे निर्माते दिनेश विजान असून या आधी दिशेन यांनी 'स्त्री 2'चे निर्माते होते.

निर्माते दिनेश विजान म्हणतात, "छावा हा केवळ एक चित्रपट नाही तर छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणादायी कथा जिवंत करणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आमच्यासाठी हा केवळ एक सिनेमॅटिक अनुभव नाही तर एक महाकाव्य महाराजांचा जीवनाचा प्रवास आहे. या कथेच्या निर्मितीसाठी आम्ही व्यापक संशोधन, समर्पण आणि मेहनत घेतली आहे.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणतात, "छावा ही धैर्य, त्याग आणि अतुलनीय नेतृत्वाची एक शक्तिशाली कथा आहे. सेटवरील सर्व काही- वेशभूषा ते संवाद शक्य तितके अस्सल ठेवण्यात आले आहेत. या विलक्षण प्रवासाची झलक अनुभवण्यासाठी अजून खूप काही आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news