पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रसिद्ध यु-ट्यूबर रणवीर अलाहाबादियाचे दोन YouTube चॅनेल हॅक करण्यात आले आहेत. त्याने स्वतः ही माहिती दिली आहे. हॅकर्सनी त्याचे चॅनेल हॅकवरून त्यावरील सर्व व्हिडिओ डिलीट केले. हॅकर्सनी चॅनलचे नाव बदलून टेस्ला केले असल्याची माहिती समोर आली आहे. लोकप्रिय यु-ट्युबर आणि इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादियाचे चॅनेलवर सायबर ॲटॅक झाला आहे. त्याचे दोन यु-ट्युब चॅनेल हॅक झाले आहेत. हॅकर्सने चॅनेलचे नाव बदलून Tesla आणि Trump केले आहे. चॅनेलवर असणारे सर्व व्हिडिओ हटवले आहेत. सध्या यु-ट्यूबने या बदलेल्या चॅनेल्सना हटवले आहे.
हॅकरने अपमानास्पद लाईव्ह स्ट्रीम (लोकांना खोटी माहिती देणारा व्हिडिओ) वापरला, ज्यामध्ये एलन मस्क यांचा एआय जनरेट केलेला अवतार देण्यात आला होता. या लाईव्ह स्ट्रीममध्ये, हॅकर्सनी व्हुवर्सना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले आणि त्यांना दुप्पट परताव्याची खोटी आश्वासनेही दिली.
रणवीर अलाहाबादियाच्या चॅनलवरील AI अवतारने व्हुवर्सना QR कोड स्कॅन करण्याची आणि संशयास्पद वेबसाईटद्वारे बिटकॉईन किंवा इथरियममध्ये गुंतवणूक करण्याची सूचना दिली.
हॅकर्सने यूजर्सना एका साईटच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यासाठी सांगितले होते. या प्रकारच्या फसवणुकीला बिटकॉईन डबलिंग स्कॅम म्हटलं जातं. लोकप्रिय YouTube चॅनल्सना टार्गेट करणारे सायबर क्रिमिनल्स त्याचा उपयोग लोकांना फसवण्यासाठी करतात.
यु-ट्यूबने रणवीर अलाहबादियाच्या दोन्हीही चॅनल्सना हटवले आहे. रणवीरचे चॅनेल सर्च केल्यानंतर आधी यु-ट्यूबवर एक मेसेज दाखवत होतं, त्यामध्ये लिहिलं होत-'हे चॅनेलला पॉलिसीचे उल्लंघन केल्याने हटवण्यात आले आहे.' आता मेसेज दाखवत आहे की, 'हे पेज उपलब्ध नाही. यासाठी क्षमा करा...'
याप्रकरणी रणवीरने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्याने स्टोरी पोस्ट करत प्रश्न केला आहे की, काय हे त्यांच्या YouTube करियरचे अंत आहे. त्याने पुढे लिहिलंय, 'माझे दोन मुख्य चॅनेल्सच्या हॅक होण्याचे सेलिब्रेशन माझ्या आवडत्या पदार्थांसोबत करत आहे.'