

पुढारी ऑनलाईन डेस्क - यूट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने कॉमेडियन समय रैनाच्या "इंडियाज गॉट लेटेंट" शोवर एक अशी काही कॉमेंट केली केली की, ज्यामुळे सोशल मीडिया युजर्स त्याच्यावर भडकले आहेत. रणवीर अलाहबादियाने "बीयरबायसेप्स" चॅनेलसाठी ओळखला जातो. त्याचे यूट्यूबवर एक कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने नुकताच एखा शोमध्ये एका कंटेस्टेंटला असा एक प्रश्न विचारला की, जे सोशल मीडिया युजर्सना अजिबात आवडला नाही. हे फारचं लज्जास्पद म्हटले जात आहे. शोच्या या एपिसोडमध्ये आशीष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्व मुखीजा कंटेंट क्रिएटर देखी होते. इन्स्टाग्रामवर त्यांना "द रिबेल किड" नावाने ओळखले जाते.
रणवीर अलाहबादियाच्या या कॉमेंटचा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी रणवीरवर प्रश्न उपस्थित केला आहे. कंटेंट क्रिएटर नीलेश मिसराने रणवीरला "परवर्ट क्रिएटर" (विकृत रचनाकार) म्हटलं आहे. नीलेशने लिहिलंय, "या कंटेंटला अडल्ट कंटेंट म्हणून मार्क करण्यात आलेले नाही. एक लहान मुलगादेखील हे सहजपणे पाहू शकतो. क्रिएटर्स वा प्लॅटफॉर्मला आपल्या जबाबदारीची जरादेखील जाणीव नाही. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटत नाही की, डेस्कवर बसलेले चार लोक-प्रेक्षकांमध्ये खूप साऱ्या लोकांनी विनोदाने घेऊन हास्याचे फवारे उडवले. प्रेक्षकांमी यास आणि अशा लोकांना नॉर्मल बनवलं आहे आणि सेलिब्रेट केलं आहे.''
एका युजरने हेदेखील म्हटलं की, अमिताभ बच्चन याना "कौन बनेगा करोडपति मध्ये असे चेहरे आणण्यासाठी...". समय रैना, कंटेंट क्रिएटर तन्मय भट, भुवन बाम आणि कामिया जानी यांच्यासोबत टेलिव्हिजन गेम शोमध्ये दिसले होते.
हे पहिल्यांदाच घडत नाहीये. याआधीही समय रैनाचे यूट्यूब रिॲलिटी शो "इंडियाज गॉट लॅटेंट" चर्चामध्ये आले आहे. मागील आठवड्यात अरुणाचल प्रदेशातील एका कंटेस्टेंट सोबत कुत्र्याच्या मांसवर कॉमेंट करण्यासाठी केस दाखल झाली होती.