असं बोलायला नको होतं, मला माफ करा; वादानंतर रणवीर अलाहाबादियाचा माफीनामा

Ranveer Allahbadia | असं बोलायला नको होतं, मला माफ करा; वादानंतर रणवीर अलाहाबादियाचा माफीनामा
Ranveer Allahbadia
रणवीर अलाहाबादियाचा माफीनामाX account
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - समय रैनाच्या कॉमेडी शोमध्ये आक्षेपार्ह कॉमेंटवर वाद झाल्यानंतर प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने माफी मागितली आहे. त्याने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करुन त्याने म्हटले की, त्याचं कॉमेंट फनी नव्हतं. त्याला कॉमेडी करता येत नाही, त्याने यासाठी खंत व्यक्त केलीय. रणवीरने व्हिडिओ बनवणाऱ्यांना हेदेखील सांगितलं की, त्या क्लिपमधील असंवेदनशील भाग हटवा. त्याने जनतेशी एक उत्तम माणूस बनण्याचे वचन दिले. तसेच सांगितले की, या संपूर्ण अनुभवाने त्याला कोणती शिकवण मिळालीय. (Ranveer Allahbadia)

तो म्हणाला, माझी कॉमेंट न केवळ चुकीची होती तर ती अजिबात विनोदी नव्हती. मी इथे माफी मागायला आलो आहे. माझा निर्णय चुकीचा होता, असे करणे कूल नव्हते. पॉडकास्ट प्रत्येक वयातील लोक पाहतात. मी असा व्यक्ती बनू इच्छित नाही, जो ती जबाबदारी खूप हलक्यामध्ये घेतो. या संपूर्ण अनुभवातून माझी शिकवण हिच असेल की, मी या प्लॅटफॉर्मला उत्तम पद्धतीने चालवेन. मी वचन देतो की, मी उत्तम व्यक्ती बनेन. मी व्हिडिओ मेकर्सना सांगितले आहे की, त्यातील असंवेदनशील हिस्सा हटवावा. अखेरीस मी हे सांगू इच्छितो की, मला दु:ख आहे. मी अपेक्षा करतो की, एक माणूस म्हणून तुम्ही मला माफ कराल.

काय होतं प्रकरण?

रणवीर अलाहबादिया कॉमेडी शो इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये गेस्ट म्हणून पोहोचला होता. तिथे त्याने एका कंटेस्टेंटशी पालकाबद्दस अश्लील प्रश्न विचारला. यावरून रणवीरवर लोक खूप भडकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news