Krishna Mukerji Passes Away: राणी मुखर्जीची आई कृष्णा मुखर्जी यांचे निधन; बंगाली चित्रपट सृष्टीत दिलं होतं भरीव योगदान

Krishna Mukerji Passes Away
Krishna Mukerji Passes Awaypudhari
Published on
Updated on

Krishna Mukerji Pass away: बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची आई कृष्णा मुखर्जी यांनी ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याबाबतच्या वृत्ताला यश राज फिल्म्सने दुजोरा दिला आहे. त्यांनी याबाबत एक वक्तव्य प्रसिद्ध केलं. मुखर्जी कुटुंबीयांनी या दुःखद प्रसंगी आमच्या प्रायव्हसीचा सन्मान केला जावा अशी मागणी केली आहे. कृष्णा यांच्या मृत्यूचं कारण अजून समोर आलेलं नाहीये. कृष्णा यांनी बंगाली चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून भरीव योगदान दिलं आहे.

Krishna Mukerji Passes Away
Mardaani 3 Trailer: भिडायला तयार राणी मुखर्जी, खतरनाक 'मर्दानी ३' चा ट्रेलर भेटीला

यशराज फिल्म्सचे अधिकृत वक्तव्य

यशराज फिल्मने आपल्या अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं. ते त्या वक्तव्यात म्हणतात, 'जड अंतःकरणाने आम्ही राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाची बातमी देत आहोत. त्यांनी ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आमचे कुटुंबीय तुमचे प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी कृतज्ञ आहे. आम्ही या दुखःच्या काळात प्रायव्हसीची आदरपूर्वक विनंती करत आहे.'

Krishna Mukerji Passes Away
IFFI 2023 : आपल्या वयाची जाण ठेवून भूमिका स्वीकाराव्यात : राणी मुखर्जी

कृष्णा मुखर्जी पार्श्व गायिका होत्या

राणी मुखर्जी आणि त्यांची आई कृष्णा मुखर्जी या सतत सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसत होत्या. दोघींमध्ये माया लेकीचं घनिष्ठ नातं होतं. कृष्णा या देखील कलाकार होत्या. त्या बंगाली चित्रपट सृष्टीशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी पार्श्व गायिका म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. त्यांनी १९८२ मधील प्रसिद्ध चित्रपट तिसरी आंख मधील ईद के दिन गले मिल ले राजा या गाण्याला आपला आवज दिला होता.

Krishna Mukerji Passes Away
Oscar 2027: मराठी चित्रपटासाठी ऐतिहासिक क्षण! ‘गोंधळ’ पोहोचला 'ऑस्कर'च्या शर्यतीत; महाराष्ट्राच्या मातीतली कथा आता जगभर पोहचणार

राणी मुखर्जीला चित्रपटातून काढून टाकणार होत्या.

राणी मुखर्जीला चित्रपट सृष्टीत येण्यासाठी तिच्या आई कृष्णा यांनीच प्रोत्साहित केलं होतं. मात्र २०२५ च्या एका मुलाखतीत राणी मुखर्जीने खुलासा केला की त्यांच्या आईनेच तिला तिच्या पहिल्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

राणी मुखर्जीने सांगितलं की माझ्या पहिल्या स्क्रीन टेस्टनंतर माझ्या आईला माझे काम इतकं खराब वाटलं की त्यांनी राजा की आएगी बारात या चित्रपटाच्या निर्मात्यांना म्हणजे सलीम अंकल यांना सांगितल की मला वाटतं की माझ्या मुलीला घेऊन तुम्ही चित्रपट केला तर तो चित्रपट ती खराब करून टाकेल. तुमचं नुकसान होईल त्यामुळं तुम्ही तिला घेऊ नका.

मात्र सलीम यांनी मला साईन करण्यासाठी खूप उत्सुक होते. मात्र माझ्या आईला माहिती होतं की तिच्या मुलीनं चांगलं काम केलेलं नाहीये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news