

रणदीप हुड्डाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी लिनसोबतचा फोटो शेअर करत खास गुड न्यूज दिली. त्याच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये कुतूहल वाढले असून नव्या घोषणा किंवा आनंददायी प्रसंगाबद्दल चर्चा सुरू आहे.
Randeep Hooda-Lin Laishram shared good news on social media
मुंबई - अभिनेता रणदीप हुड्डाने आपल्या पत्नी समवेतचा फोटो शेअर करून आनंदाची वार्ता दिलीय. रणदीपने नाईट कॅम्प फायरचा फोटो शेअर केलाय. दोघेही शेकोटीला बसले असून त्याने इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर केलीय.
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि साधेपणामुळे चर्चेत असतो. परंतु या वेळी तो वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त रणदीपने एक खास गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोशल मीडियावर त्याने पत्नी लिन लाशरामसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट करत या आनंदाची घोषणा केली. काही तासांतच हा फोटो आणि पोस्ट व्हायरल झाले.
काय म्हटलंय पोस्टमध्ये?
इन्स्टाग्रामवर रणदीप हुड्डाने आपली पत्नी लिन लॅशराम सोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दिसतं की, दोघे पती-पत्नी जंगलात शेकोटी पेटवून बसले आहेत. दोघे हसताना दिसताहेत. कॅप्शनमध्ये लिहिलंय-' प्रेम आणि रोमांचचे दोन वर्ष आणि आता आणकी कुणीतरी येणार आहे.' कॅप्शनमध्ये त्याने हार्ट इमोजी शेअर केला आहे. रणदीप हुड्डाने ही पोस्ट शेअर करताच व्हायरल झाली आहे.
रणदीप हुड्डाची पत्नी कोण आहे?
रणदीप हुड्डाने २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी लिन लॅशरामशी लग्न केलं होतं. त्यांनी मैतेई परंपरेने मणिपूर इम्फाळमध्ये लग्न केले होते. लग्नानंतर मुंबईत रिसेप्शनही दिलं होतं. रणदीप हुड्डाची पत्नी लिन लॅशराम अभिनेत्री असून तिने शाहरुख खानच्या 'ओम शांति ओम'मधून बॉलीवूड डेब्यू केला होता. ती मॉडल आणि व्यावसायिक देखील आहे. ती 'जाने जान' २०२३ मध्ये दिसली होती. 'मेरी कॉम'मध्येही तिने काम केले होते.
रणदीप अखेरीस सनी देओलचा चित्रपट 'जाट'मध्ये दिसला होता. आता तो २०२६ मध्ये रिलीज होणारा इंग्लिश चित्रपट 'मॅचबॉक्स'मध्ये