पुढारी ऑनलाईन डेस्क : यशराज बॅनरच्या बहुचर्चित आणि प्रसिद्ध चित्रपट 'धूम'च्या पुढच्या भागात रणबीर कपूर दाखल झाला आहे, त्याच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त ही बातमी समोर आली आहे की, रणबीर 'धूम ४ मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत निमति आणि रणबीर यांच्यात क्याच दिवसांपासून चर्चा सुरु असल्याचे ऐकायला मिळत आहे.
सूत्रांच्या मते, रणबीरला या चित्रपटात नेहमीच रस होता त्याची मूळ कल्पना ऐकून तो त्यावर काम करण्यास तयार झाला होता आणि आता तो 'धूम ४'चा भाग होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या फ्रँचायझीशी संबंधित असलेले अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यासारखे इतर कलाकार 'धूम ४' मध्ये दिसणार नाहीत, असेही संकेत आहेत. यावेळी निमति या चित्रपटाचा सिक्वेल बनवत नाहीत, तर रिबूट करत आहेत, त्याची कथा नव्याने तयार होईल. तरुण पिढीतील दोन नवीन नायक पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
चित्रपटाची कथा लॉक झाली असून आता टीम कास्टिंगचे काम सुरू होणार आहे. वर्क फ्रंटवर बोलायचे झाले, तर सध्या रणबीर 'रामायण'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा पहिला पौराणिक चित्रपट आहे. यामध्ये तो श्रीरामाची भूमिका साकारत आहे.