Ranbir Kapoor | चिमुकल्या हातांनी राहाने केलं विश, रणबीर आलियासोबत समुद्रकिनारी बर्थडे व्हेकेशनवर

Ranbir Kapoor Birthday | चिमुकल्या हातांनी राहाने केलं विश, रणबीर आलियासोबत समुद्रकिनारी बर्थडे व्हेकेशनवर
ranbir kapoor-alia bhatt
Ranbir Kapoor birthday celebration Instagram
Published on
Updated on

मुंबई - काल २८ सप्टेंबर रोजी अभिनेता रणबीर कपूरने ४३ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सेलिब्रिटींसह, परिवार आणि फॅन्सनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रणबीरची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर साहनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पत्नी, अभिनेत्री आलिया भट्टने देखील सोशल मीडियावर रणबीरसोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज रणबीरसाठी खास ठरले आहेत.

ranbir kapoor-alia bhatt
Dussehra 2025 Bobby Deol | "दसऱ्याची सर्वात मोठी सरप्राईज एन्ट्री करणार बॉबी देओल, 'रामलीला'मध्ये खास भूमिका

या खास दिवशी रणबीरचा वाढदिवस अधिक खास ठरला. कारण पत्नी आलिया भट्ट आणि मुलगी राहासोबत त्याने समुद्रकिनारी हा दिवस साजरा केला. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रणबीर आणि आलिया दोघेही व्हेकेशनवर गेल्याचे दिसते. समुद्रकिनारी शांत वातावरणात त्यांनी खासगी पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन केल्याचे फोटोतून कळते. यावेळी राहाने रणबीरला आपल्या चिमुकल्या हातांनी ‘बर्थडे विश’चे लेटर लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आलिया भट्टची पोस्ट व्हायरल

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये रणबीर-आलिया सोबत सूर्यास्त पाहताना दोघे पाठमोरे दिसताहेत. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांची मुलगी राहा रणबीर सोबत केक कापताना दिसतात. आणखी एका खूप सुंदर फोटोत राहाने आपल्या वडिलांसाठी एक प्रेमळ नोट लिहिली. या नोटमध्ये लिहिलं- 'या जगातील सर्वात बेस्ट पापा.. हॅप्पी बर्थ डे.'

raha kapoor hands
Raha Kapoor cut the cake with father Ranbir Instagram
फॅन्सना वाटली राहाची चिंता
दुसऱ्या फोटोत रणबीर कपूर - आलिया भट्टची मुलगी राहाच्या हातावर काहीतरी निशाण दिसताहेत. हे पाहून फॅन्स चिंतेत पडले. त्यांना वाचले की, काही तर जखमेचे किंवा भाजलेले निशाण असावे. एका फॅनने कॉमेंट सेक्शनमध्ये लिहिलं, 'राहाला काय झालं?' आणकी एकाने म्हटलं, 'राहाला भाजलं आहे की तिला लागलं आहे.' आणखी एकाने म्हटलं, 'होऊ शकतं की, राहाला ॲलर्जी झाली असेल?'
ranbir kapoor-alia bhatt
Avika Gor: 'धमाल विथ पति पत्नी और पंगा' | अविका गौरने राधे मांचे घेतले आशीर्वाद, भडकले लोक

आलियाने या पोस्टसोबत एक भावूक संदेश देखील लिहिला, 'happy birthday our whole and soul'. सोबतच तिने रेड हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत. या पोस्टवर फॅन्स आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news