Rakkayie Title Teaser : नयनतारा घेऊन आली 'रक्कायी' टायटल टीझर

Nayanthara घेऊन आली 'Rakkayie' टायटल टीझर
happy birthday Nayanthara
वाढदिवसालाच नयनताराच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - साऊथ लेडी सुपरस्टार नयनताराच्या आगामी चित्रपट 'रक्कायी' चा टायटल टीझर लॉन्च करण्यात आला आहे. ड्रमस्टिक्स प्रोडक्शन्स आणि मूवीवर्स स्टुडिओज बॅनर अंतर्गत या चित्रपटात नयनताराचा दमदार ॲक्शन अवतार पाहायला मिळेल. चित्रपटाचे दिग्दर्शन- लेखन सेंटिल नल्लासामी यांनी केलं आहे. तर वेदिक्करनपट्टी एस. शक्तिवेल - आदित्य पिट्टी यांची निर्मिती आहे. आज नयनताराची वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त तिच्या नव्या चित्रपटाचे टायटल टीझर व्हिडिओ रिलीज करण्यात आले आहे.

टीझरमध्ये नयनतारा एका आईच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या लहान बाळाच्या सुरक्षेतसाठी दहशतवाद्यांशी भिडते. ती टीझरमध्ये ॲक्शन्स सीन्स करताना दिसतेय. बाळासाठी भावूक होतानाही दिसते. तिच्या परफॉर्मन्ससाठी फॅन्सकडून अधिक कॉमेंट्स मिळत आहे. फॅन्स सोशल मीडियावर टीझरचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. लवकरच या चित्रपटाची रिलीज डेट घोषित केली जाईल, असे म्हटले जात आहे.

happy birthday Nayanthara
Baaghi 4 | पुन्हा मारझोड, हाणामारी! नव्या लूकमध्ये टायगर श्रॉफ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news