Rajpal Yadav met Mushtaq Khan|''त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला'', मुश्ताक खान यांच्या मृत्यूपूर्वी काय घडलं? राजपालने सांगितला किस्सा

Rajpal Yadav met Mushtaq Khan|''त्यांनी मला ओळखले, माझा हात आपल्या हातात घेतला'', मुश्ताक खान यांच्या मृत्यूपूर्वी काय घडलं? राजपाल यादवने सांगितला किस्सा
Rajpal Yadav- Mushtaq Khan
Rajpal Yadav met Mushtaq Khan
Published on: 
Updated on: 

अभिनेते राजपाल यादव यांनी दिवंगत अभिनेते मुश्ताक खान यांच्या आठवणीबद्दल एक भावूक किस्सा शेअर केलाय. निधनाच्या अवघे काही तास आधी त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचे सांगत राजपालने ही आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेते मुश्ताक खान वयाच्या ५६ व्या वर्षी कर्करोगाशी लढा देताना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पण यापूर्वी, अभिनेता राजपाल यादवने रुग्णालयात जाऊन मुश्ताक खान यांची भेट घेतली.

मृत्यूच्या दोन तास आधी नेमकं काय घडलं? हे राजपाल यादव यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमधून सांगितलं. गुरुवारी अखेरचा श्वास घेण्यापूर्वी अवघ्या दोन तासांआधी मुश्ताक यांची भेट घेतल्याचं राजपालने सांगितलं. मृत्यूनंतर राजपाल यादवने एक अतिशय संवेदनशील पोस्ट लिहित मुश्ताक यांचा फोटोही शेअर केला.

राजपालने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, "आज दुपारीच मी त्यांना भेटायला गेलो होतो. आम्ही गप्पा मारल्या. त्यांनी मला ओळखले. माझा हात आपल्या हातात घेतला. मी जे सांगत होतो, त्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिसादही दिला. ज्या मित्रासोबत मी अवघ्या दोन तासांमागे हस्तांदोलन केले होते, तो आता या जगात नाही. मला विश्वासच बसत नाहीये. दैवाच्या खेळापुढे आपण सगळे हतबल आहोत. मुश्ताक भाई एक उत्तम व्यक्ती व कसलेले कलाकार होते. जे नेहमीच आपल्या आठवणीत असतील. अतिशय जड अंतःकरणाने मी त्यांना अखेरचा निरोप देतो."

सिनेसृष्टीत शोककळा

अभिनेता सनी देओलने मुश्ताक यांच्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्याने लिहिले की, "मुश्ताक खान यांच्या निधनाची बातमी मनाला वेदना देणारी आहे. ते एक मनमिळाऊ व्यक्ती होते. माझ्या त्यांच्यासोबतच्या अनेक सुंदर आठवणी आहेत. या दुःखाच्या प्रसंगी परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो."

मीडिया रिपोर्टनुसार, मुश्ताक खान हे मागील काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) भरती करण्यात आले होते. पण, रुग्णालयातच गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे निकटवर्तीय शिवम यांनी सांगितले की, "गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांना काही वर्षांपूर्वी फुफ्फुसाचा कर्करोग जडला होता आणि त्यातून ते बरेही झाले होते. परंतु, गेल्या आठ दिवसांत प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. कर्करोग लास्ट स्टेजला होता."

Rajpal Yadav- Mushtaq Khan
Actor Mushtaq Khan death : ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुश्ताक खान यांनी १९८० मध्ये 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. 'वेलकम', 'आशिकी', 'मुझसे शादी करोगी', 'हम हैं राही प्यार के' यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

Rajpal Yadav- Mushtaq Khan
Sooraj Pancholi: 'दिशा आणि आदित्य ठाकरेंना...', दिशा सालियन प्रकरणावर सूरज पांचोलीच्या नव्या खुलाशाने खळबळ, काय म्हणाला?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news