राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित वेबसीरिज

राजीव गांधी
राजीव गांधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचे कटकारस्थान आता वेबसीरिजच्या रूपाने ओटीटीवर येणार आहे. नागेश कुकुनूर हे या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. माजी पत्रकार अनिरुद्ध मित्रा यांच्या 'नाईन्टी डेज ः द स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधी असॅसिन' या पुस्तकावर ही वेबसीरिज आधारित असणार आहे. राजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या शोधावर हे पुस्तक आधारित आहे. मित्रा यांनी या विषयावर खूप काम केले आहे.

या प्रकरणातील अनेक बातम्या त्यांनी ब—ेक केल्या होत्या. या पुस्तकात सीबीआयच्या विशेष तपास पथकाने हत्येच्या कारस्थानाचा कसा पर्दाफाश केला, मारेकर्‍यांची ओळख आणि मास्टरमाईंडला कसे पकडले, हे सर्व पाहता येईल. दरम्यान, या विषयावर यापूर्वी शुजित सरकार दिग्दर्शित जॉन अब—ाहमचा 'मद्रास कॅफे' हा एक चांगला चित्रपट येऊन गेला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news