

Superstar Rajinikanth ‘Jailer २’ fans celebrations सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षीत जेलर २ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडीओंमध्ये दिसते की रजनीकांत यांचे चाहते वेगवेगळ्या मार्गाने आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. अनेक थिअटरबाहेर फिल्मच्या पोस्टरला दुग्धभिषेक घालताना दिसत आहेत. तर आतिषबाजीने आसमंत उजळताना दिसत आहेत.
मुंबईत चाहत्यांचा हा जबरदस्त जल्लोष
मुंबईयेथील एका व्हिडीओत दिसून येते की रजनीकांत यांचे जेलर 2 चित्रपटातील पोस्टर सजवलेल्या रथात ठेवून त्याची मिरवणूक काढलेली दिसत आहे. तर एकाने रजनीकांत यांचे पोस्टर खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहेत. चाहते त्यावर दुधाचा अभिषेक घालताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या रिलीजच्या आनंदात हा सर्व चाहते जल्लोष करताना दिसत होते. दरम्यान मुंबईतील विविध चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी हा क्षण एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला.
चित्रपटाच्या पहिल्या शोसाठी सकाळपासूनच चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली. ढोल-ताशांच्या तालावर नाचताना आणि रजनीकांत यांच्या खास स्टाइलची नक्कल करताना चाहते दिसून आले.
बंगळुरूमध्ये फटाक्यांची आतषबाजी, पूजा आणि ढोल-ताशांचा गजर
भारतातील चित्रपटगृहांबाहेरही उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. बंगळुरूमध्ये सकाळी ६.३० वाजताच्या शोपूर्वी चाहत्यांनी फटाक्यांची मोठी आतषबाजी केली. अनेक ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी पूजा-अर्चा केली, रस्त्यावर नारळ फोडले आणि रजनीकांत यांचे उंचच उंच कटआउट्स उभारले.
या कटआउट्सना मोठमोठ्या फुलांच्या हारांनी सजवण्यात आले होते. ढोल-ताशांच्या तालावर नाचणारे चाहते, रजनीकांत यांच्या नावाचा जयघोष आणि पहाटेच्या शोसाठी झालेली गर्दी यामुळे अनेक चित्रपटगृहांबाहेर जत्रेसारखे वातावरण पाहायला मिळाले.
दुबईत पहाटे ३ वाजताच चित्रपटगृहे हाऊसफुल्ल
भारतात पहाट होण्यापूर्वीच जगातील इतर भागांत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा उत्साह पाहायला मिळाला. दुबईतील दीरा सिटी सेंटरमधील चित्रपटगृहांमध्ये पहाटे ३ वाजताच प्रेक्षकांची गर्दी जमली होती. पहाटेच्या सुमारासही चाहते रजनीकांत यांच्या नावाचा जयघोष करताना दिसले. चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांनी मोठ्या उत्साहात चित्रपटाचे स्वागत केले.