Raja Shivaji OTT Release: 100 कोटींचा विक्रम करणारा ‘राजा शिवाजी’ आता OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

Raja Shivaji OTT Release: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा सुपरहिट मराठी चित्रपट आता OTT वर प्रदर्शित होणार आहे.
Raja Shivaji OTT Release
Raja Shivaji OTT ReleasePudhari
Published on
Updated on

Raja Shivaji OTT Release: मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचणारा आणि बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणारा ‘राजा शिवाजी’ आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या या भव्य ऐतिहासिक चित्रपटाला सिनेमागृहांत प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता थिएटरमध्ये चित्रपट पाहता न आलेल्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.

OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 26 जूनपासून Netflix वर स्ट्रीम होणार आहे. नेटफ्लिक्सकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबाबत चर्चा रंगली आहे. त्यामुळे घरबसल्या हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास

‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनानंतर मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला. सुमारे 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 110 कोटी रुपयांची कमाई करत मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच 100 कोटींचा टप्पा गाठला. इतकंच नाही तर जगभरात या चित्रपटाने 114.8 कोटी रुपयांचा गल्ला जमवत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होण्याचा मानही मिळवला.

रितेश देशमुख यांची दुहेरी जबाबदारी

या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले असून त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयासह चित्रपटातील भव्यता, युद्धदृश्ये आणि ऐतिहासिक मांडणी याचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले.

Raja Shivaji OTT Release
Stock Market Crash: फक्त 'या' 3 कारणांमुळे... शेअर बाजारात मोठा भूकंप; सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला, नेमकं काय घडलं?

दमदार स्टारकास्ट

‘राजा शिवाजी’मध्ये अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. चित्रपटात:

  • रितेश देशमुख

  • संजय दत्त

  • जेनेलिया देशमुख

  • महेश मांजरेकर

  • अभिषेक बच्चन

  • विद्या बालन

  • अमोल गुप्ते

  • भाग्यश्री

यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचाही चित्रपटात खास कॅमिओ आहे.

1 मे रोजी झाला होता प्रदर्शित

हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट 1 मे 2026 रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची भव्य कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

आता थिएटरनंतर ओटीटीवरही ‘राजा शिवाजी’ किती मोठा विक्रम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः मराठीसह हिंदी आणि इतर भाषांतील प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news