

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा आपल्या पहिल्या वाहिल्या पंजाबी सिनेमात सिनेमात दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या सिनेमाच्या शूटिंगबाबत शेअर केले होते. मोहाली येथे या सिनेमाचे शूटिंग पार पडले. केवळ 30 दिवसांत या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. राज त्यावेळी पोस्ट शेयर करत ही बाब शेयर केली आहे. (Latest Entertainment News)
राजसोबत या सिनेमात गीता बसराही पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमात ती सिम्मीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या भूमिकेबाबत बोलताना ती म्हणते, ‘ हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. ही गोष्ट फक्त माझ्या भूमिकेची नाही. या सगळ्या टीमची ही आहे. सगळ्यात आधी मी मुकेश छाबडा यांचे आभार मानते. ज्यांनी मला हा रोल दिला. आणि सिनेमातील सिम्मी माझ्यात पाहिली. ते मला नेहमी म्हणायचे गीता माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी काहीतरी चांगलेच करेन. यासाठी धन्यवाद.’
यासोबतच तिने को स्टार राज कुंद्रा याचेही आभार मानले आहेत. ती म्हणते,’ या व्यक्तिरेखेसाठी तुम्ही खरेच अतोनात कष्ट घेतले आहेत. करमच्या व्यक्तिरेखेसाठी तुम्ही घेतलेली मेहनत एकेदिवशी फळास येईल. अभिनय क्षेत्रात तुमचे स्वागत आहे.
राज या सिनेमात करमजीतच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या भूमिकेबाबत तो म्हणतो, ‘ करमजीतच्या भूमिकेत दिसणे हा माझ्यासाठी आयुष्य बदलवणारा अनुभव होता. करमजीत सिंग हा भावनिक माणूस आहे. ज्याचे स्वत:च्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे.
यापूर्वी राज कुंद्रा ut 69 चारित्रात्मक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर त्याचा मेहर सिनेमा 5 सप्टेंबरला रिलीज होतो आहे.