रागिनी खन्ना : गोविंदाच्या गाण्यावर भाचीचे जबरी ठुमके

रागिनी खन्ना : गोविंदाच्या गाण्यावर भाचीचे जबरी ठुमके
ragini khanna
ragini khanna
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क टीव्ही अभिनेत्री रागिनी खन्ना ही आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सतत खास अपडेट्स देत असते. रागिनीने नेहमीच चाहत्यांपुढे जाहीर केले आहे की ती 'देसी गर्ल' आहे. रागिनी खन्ना ही अभिनेता गोविंदाची भाची आहे. 'जागतिक नृत्य दिन' अर्थात 'वर्ल्ड डान्स डे'च्या निमित्ताने रागिनी खन्नाने आपल्या सोशल मीडिया अकांउटच्या माध्यमातून एक व्हीडियो पोस्ट केला. यामध्ये ती तिचा मामा गोविंदाच्या प्रसिद्ध गाण्यावर जबरी ठुमके लावताना दिसते. 'मेरे प्यार का रस जरा चखणा.. ओए मखणा..' हे ते गाणं तिच्या बॅकग्राऊंडला वाजत आहे. या गाण्यावर ती लटके झटके लावताना दिसतेय.

रागिनी खन्नाने 'कू' ॲपवर एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ जागतिक नृत्य दिनाला अर्पण करत तिने लिहिले, "मी प्रामाणिकपणे कबूल करते, माझ्या कुटुंबाला नृत्याची फार आवड आहे. आमच्या घरातल्या सगळ्या पार्ट्यांमध्ये आम्ही प्रचंड उत्साहाने नाचतो. या जागतिक नृत्य दिनी मी ट्विंकलच्या ५ व्या वाढदिवशी आपला आवडता डान्स पार्टनर आशुतोषसोबत गोविंदाच्या गाण्यावर घरामध्ये केलेली मस्ती शेअर करते. यात आम्ही (गाण्याच्या व्हिडिओनुसार) ओरिजनल स्टेप्स आणि हावभाव कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहोत."

या ४९ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये रागिनी आणि आशुतोष 'बडे मियां-छोटे मियां' चित्रपटाचं लोकप्रिय गाणं 'मेरे प्यार का रस जरा चखणा.. ओए मखणा…'वर एकदम फर्स्टक्लास परफॉर्म करत आहेत. गोविंदा, अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षितच्या अभिनयाने सजलेल्या या गाण्याला जबरदस्त लोकप्रियता मिळाली होती. आजही हे गाणं बऱ्याचदा डीजेवर वाजत असते. या गाण्यातला धमाल मस्तीचा मूड कायम राहावा, याचीही खबरदारी गोविंदाच्या भाचीने घेतली. गाण्याच्या शेवटी रागिनीची सिग्नेचर स्माईल अर्थात तिच्या हास्याने यात एकदमच चार चांद लावले आहेत.

याआधी भारत समजून घेण्याच्या कामात गुंतलेल्या रागिनी खन्नाने 'कू' ॲपवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, "मी सतत आपल्या देशाला जाणून घेत आडवीतिडवी भटकण्यात गुंतलेली असते. सरळ सांगायचं तर मी खूपच 'देसी' आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news